Ladki Bahin Gharkul Yojana 2025 : लाडकी बहिण घरकुल योजना हि केंद्र सरकार कडून महाराष्ट्र महिलांसाठी लागू करण्यात आलेली आहे तर या योजनेमध्ये एकूण 13 लाख घर गरजू आणि पात्र महिलांसाठी आहेत. महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिलांसाठी खूप मोठी बातमी आहे कारण ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांना आता लाडकी बहिण घरकुल योजना लागू होणार आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे कि ज्या महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळतात त्या महिलांना आता आम्ही घरकुल सुद्धा मंजूर करणार आहोत असे सांगितले आहे.
लाडकी बहिण घरकुल योजना माहिती
केंद्र सरकार मार्फत या वर्षी 6.5 लाख घर महाराष्ट्र राज्यात देण्यार येणार होते आणि आता (Ladki Bahin Gharkul Yojana) लाडकी बहिण घरकुल योजनेतून एकूण 13 लाख घरकुल देण्यात येणार आहेत तर एकूण मिळून २० लाख घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या महिलांना दर महिन्याला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळतात त्यांना आता केंद्र सरकार कडून घरकुल सुद्धा देण्यात येणार आहे परंतु या घरकुल साठी काही पात्रता आहेत ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत त्यांना नक्की घरकुल मिळणार आहे.
Ladki Bahin Gharkul Yojana GR PDF: click here.
लाडकी बहिण घरकुल योजना ऑनलाईन पद्धतीने अजून अर्ज भरण्याची माहिती केंद्र सरकार कडून दिलेली नाही परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कागदपत्रा सोबत ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जायला लागणार आहे जर या Ladki Bahin Gharkul योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात आल्यावर तुम्हाला इथे अर्ज कशा भरावा आणि अर्जाची संपूर्ण माहिती सोबत अर्जाची लिंक सुद्धा देण्यात येईल.
लाडकी बहिण घरकुल योजना अनुदान किती मिळणार?
लाडकी बहिण घरकुल योजना (Ladki Bahin Gharkul Yojana) हि सर २०२५ मध्ये सुरु करण्यात आदेश केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार कडून सांगण्यात आले आहे तर या योजनेतून महाराष्ट्र महिलांना किती अनुदान मिळणार आहे या बद्दल माहिती देण्यात आली आहे. हे अनुदान नवीन GR आल्यावर तुम्हाला सांगण्यात येईल परंतु जुन्या प्रधानमंत्री आवास योजनेचा GR मध्ये अनुदानाची माहिती दिलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला किती अनुदान मिळेल याची माहिती देतो.
भाग | अनुदानाची रक्कम |
ग्रामीण भागामध्ये | 1 लाख 20000 |
डोंगरी भागामध्ये | 1 लाख 30000 |
लाडकी बहिण घरकुल योजना पात्रता
लाडकी बहिण घरकुल योजना हि महाराष्ट्र लाडकी बहिण योजना अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे या योजनेसाठी महिलांची काही पात्रता आहे ती पात्रता पूर्ण असल्यास त्या महिलांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
1. लाडकी बहिण घरकुल योजना वयाची अट
सर्वात महत्वाचे महिती देण्यात येणार आहे कारण लाडकी बहिण घरकुल योजना साठी हि पात्रता असल्यावरच तुम्हाला घरकुल मिळू शकतो. ज्या महिलांना लाडकी बहिण योजना लागू होते, तसेच महिला कुटुंबप्रमुख 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यामध्ये निवडण्यात येणार आहे तसेच 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब यामध्ये घेण्यात येणार आहे
2. लाडकी बहिण घरकुल योजना कागदपत्रे
लाडकी बहिण घरकुल योजना २०२५ या योजनेमध्ये फक्त महिलांना लाभ दिला जाणार आहे तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहेत.
- सातबारा उतारा
- जातीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- विद्युत बिल
- बँकेची एक पासबुक
अशा प्रकारे लाडकी बहिण घरकुल योजना मध्ये कागदपत्रे लागणार आहेत आणि हि सर्व कागदपत्रे तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायची आहेत. पुढची माहिती तुम्हाला ग्रामपंचायत कडून देण्यात येईल.
दुसऱ्या योजना: