सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

ॲग्री स्टॅक शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन अर्ज – Agri Stack Maharashtra Registration

सर्व शेतकऱ्यांना भारत सरकार कडून योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र तयार करायला लागणार आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी Agri Stack Maharashtra चा अधिकृत www.mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्जाची नवीन नोंदणी करून घ्यायची आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

ॲग्री स्टॅक शेतकरी ओळखपत्र हे कोणत्याही सरकारी योजनेसाठी वापरण्यात येतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा या बद्दल माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Agri Stack Maharashtra Registration (नोंदणी): इथे क्लिक करा.

ॲग्री स्टॅक शेतकरी ओळखपत्र नवीन अर्ज

Agri Stack Maharashtra Registration
Agri Stack Maharashtra Registration

महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्यासाठी खाली दिलेली सर्व माहिती वाचून घ्यावी.

  • सर्व प्रथम महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर जायचे आहे.
  • त्या नंतर “Farmer” वरती क्लिक करायचे आणि आणि खाली “New Farmer Registration” या बटन वरती क्लिक करा.
  • तुम्हाला नवीन नोंदणी साठी आवश्यक माहिती विचारली जाईल ती पूर्ण माहिती बरोबर भरून झाल्यास नवीन नोंदणी वरती क्लिक करा.
  • त्या नंतर तुम्हाला लोगिन करायचे आहे त्यामध्ये सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड किंवा OTP टाका व लोगिन वरती क्लिक करा.
  • लोगिन झाल्यावर तुम्हाला शेतकरी ओळखपत्रासाठी अधिक माहिती विचारली जाईल ती पूर्ण माहिती भरून घ्या आणि अर्ज सबमिट करा.
  • तुमचा अर्ज pending मध्ये जाईल आणि काही दिवसाने approved केला जाईल.

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • सात बारा उतारा
  • बँक पासबुक
  • आधार लिंक मोबाईल नंबर
  • तुमचा फोटो

ॲग्री स्टॅक महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्री पात्रता

  • शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे कमीत कमी वय १८ वर्ष पाहिजे.
  • शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी.
  • आधार कार्ड बँक सोबत लिंक पाहिजे.

असा प्रकारे तुम्ही शेतकरी ओळखपत्र साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

Leave a Comment