सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Panchayat Samiti Yojana Maharashtra – पंचायत समिती योजना बद्दल संपूर्ण माहिती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

महाराष्ट्र सरकार मार्फत येणाऱ्या सर्व पंचायत समिती योजना (Panchayat Samiti Yojana) पंचायत समिती आणि जिल्हा परिषदकडे येते त्यांनतर ती योजना सर्व शेतकऱ्यांकडे पोहचवली जाते. नवीन पंचायत समिती मध्ये आलेली योजनेचे नाव पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना, पंचायत समिती कृषी विभाग योजना, पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना या प्रकारे खूप योजना महाराष्ट्र सरकार कडून जाहीर करण्यात येतात परुंतु गावातील शेतकऱ्यांना या योजना बद्दल माहिती नसते त्यामुळे काही गरजू शेतकऱ्यांना या पंचायत समिती योजना चा लाभ घेता येत नाही. मित्रांनो आजचा लेखामध्ये अस्याच नवीन नवीन येणाऱ्या योजनाबाबत आपण चर्चा करणार आहोत जेणेकरून तुमचा आजूबाजूचा शेतकऱ्यांना या योजने बद्दल माहिती मिळेल हीच आमची इच्छा आहे.

विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्यक
योजनाचे नावपंचायत समिती योजना
राज्यमहाराष्ट्र
योजनेचा उद्देशगरजू शेतकऱ्यांना मदत मिळावी
लाभार्थी माणसमहाराष्ट्रातील शेतकरी
अर्ज कसा करावा ऑफलाईन आणि ऑनलाईन
अर्जाचा नमुना pdfइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महाराष्ट्र पंचायत समिती मध्ये होणाऱ्या योजनांची यादी:

1.पशुसंवर्धन विभाग योजना
2.कृषी विभाग योजना
3.महिला बालकल्याण विभाग योजना
4.शिक्षण योजना
5.रोजगार निर्मिती योजना

पंचायत समिती योजना संपूर्ण माहिती – Panchayat Samiti Yojana

महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवीन नवीन योजना राबवत असतो. हि सर्व महाराष्ट्रातील सरकार द्वारे योजना काढल्या जातात त्या सर्व प्रथम पंचायत समिती मध्ये येतात त्या नंतर पंचायत समिती कडून योजनेची माहिती शेतकऱ्यांकडे पोहचवली जाते आणि मग शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन योजनेसाठी अर्ज करतो. या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार किंवा शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला पाहिजे.

इतर योजना:

Rojgar Sangam Yojana
Sheli Mendhi Palan Yojana
Biyane Tokan Yantra Yojana

पंचायत समिती योजना मुख्य उद्देश

  • महाराष्ट्र शासन कडून येणाऱ्या सर्व योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • या सर्व योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्यासाठी पुरावा म्हणून तुमचा कडून प्रमाणपत्र मागितले जाईल.
  • महाराष्ट्र राज्यात न राहणाऱ्याना या योजेनेचा लाभ मिळू शकणार नाही.
  • अर्जदाराची वयोमर्यादा 18 वर्षा पेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
  • वार्षिक उत्पन्न 50 हजार पेक्षा जास्त नसावे.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा आधार कार्ड बँक खात्या सोबत लिंक असायला पाहिजे.

पंचायत समिती योजनासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे

सर्व योजनेसाठी हि कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे तरच या सर्व योजनेचा लाभ घेता येईल. कागदपत्राची यादी खाली आहे.

  • मोबाईल नंबर, इमेल आणि फोटो
  • आधार कार्ड
  • बँक खाते
  • रहिवासी दाखला
  • सात बारा उतारा
  • जन्म प्रमाणपत्र
  • आणि हमीपत्र

पंचायत समिती योजनाची यादी

पंचायत सिमिती मध्ये सर्वात जास्त योजनेचा लाभ पशुसंवर्धन विभाग योजना, कृषी विभाग योजना आणि महिला बालकल्याण विभाग योजना या तीन योजनेचा लाभ शेतकरी खूप घेतात कारण या योजनेची माहिती सर्व शेतकऱ्यांकडे आहे आणि ह्या सर्व योजना खूप आधीपासून महाराष्ट्र सरकार शासन मार्फत काढल्या गेल्या होत्या.

महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वापर केल्या जाणाऱ्या योजनाची यादी:

  • पशुसंवर्धन विभाग योजना
  • कृषी विभाग योजना
  • महिला बालकल्याण विभाग योजना

पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना

पशुसंवर्धन विभाग योजनेसाठी महाराष्ट्र सरकार कडून शेतकऱ्यांना बैलजोडीसाठी, कुक्कुटपालन, म्हैस किंवा गाय या सर्व खरीदी करण्यासाठी सरकार कडून अनुदान मिळते तर या बद्दल सर्व माहिती बघणार आहोत.

पशुसंवर्धन अनुदान/ रक्कम
बैलजोडी75% अनुदान
महिलांना 1 म्हैस किंवा गाय खरीदीसाठी50% अनुदान
गीर, थारपारकर किंवा साहिवाल गाय75% अनुदान किंवा पंचेचाळीस हजार रुपये
गोठा तयार करण्यासाठी15 हजार रुपये
मिल्किंग मशीन15 हजार रुपये
15 मेट्रिक टन (मुरघास युनिट)15,000 रुपये
कुक्कुटपालन75% अनुदान

पंचायत समिती कृषी विभाग योजना

महाराष्ट्र शासन च्या अंतर्गत पंचायत समिती कडून कृषी विभाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांना खूप उपयोगी ठरतो या योजनेचा माध्यमातून डिझेल पंप, प्लास्टिक क्रेट, पाईप, ट्रॅक्टर , सोलर वॉटर हिटर आणि इतर प्रकारच्या सरकार कडून अनुदान मिळतो तर या याजानेचा लाभ सर्व शेतकऱ्यानी घेतले पाहिजे.

डिझेल पंप5 H.P.
प्लास्टिक क्रेट20 K.G.
पीव्हीसी पाईप2.5 – 3 Inch
ओपनवेल विद्युत मोटार3 H.P. – 5 H.P.
सोलर वॉटर हिटर200L मध्ये 50% अनुदान
हॉरिझॉन्टल ट्रिपल पिस्टन स्प्रेपंपसरकार कडून आर्थिक मदत
कडबाकुट्टी यंत्र मोटारसरकार कडून आर्थिक मदत

पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना

महाराष्ट्र सरकार मार्फत महिला बालकल्याण विभाग योजना चा माध्यमातुन महिलांना खूप काही गोष्टींची आर्थिक महाराष्ट्र सरकार कडून मिळते. महिला बालकल्याण विभाग योजनाचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वयोमर्यादा किमान १८ वर्ष पूर्ण झाले पाहिजे. वयाची अट १८ वर्ष कमी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

मिळणारी योजनारक्कम/अनुदान
1. चारचाकी वाहन प्रशिक्षण3,000 रुपयांची मदत
2. इयत्ता 7वी ते 12वी शिक्षणासाठी4,000 रुपये
3. MS-CIT साठी3,500 रुपये
4. महिलांना व्यावसायिक व जीवनावश्यक वस्तूची खरेदी साठी12,500 रुपयांची मदत
5. घरगुती पीठ गिरणी आणि शिलाई मशीन साठी90% अनुदान
6. 5 वी च्या शाळेतील विध्यार्थ्यांना सायकल खरेदी साठी4,500 रुपये

Panchayat Samiti Yojana Application – पंचायत समिती योजनासाठी अर्ज

  • इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने पंचायत समिती मधून अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यसाठी कोणतीही एक योजना निवडा आणि पंचायत समिती मधून त्या योजनेचा अर्ज नमुना घ्या.
  • अर्ज नमुन्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून पंचायत समितीमध्ये जमा करायचे आहे.
  • काही दिवसाने तुमचा अर्ज पंचायत समितीकडून स्वीकारला जाईल आणि तुमचा मोबाईल नंबर वरती फोन किंवा मेसेज द्वारे कळवण्यात येईल.

पंचायत समिती योजनेसाठी केलेले अर्ज कसे तपासायचे?

1. कोणत्याही पंचायत समिती योजनेसाठी अर्ज केले असेल तर अर्ज तपासणीसाठी सर्व प्रथम www.nrega.nic.in या संकेतस्थळावर जायचे आहे तिथे “Generate Reports” या पर्याय वरती क्लिक करा.

2. त्या नंतर तिथे सर्व राज्याची नावे येतील त्यामधून आपले महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे. निवडण्यासाठी महाराष्ट्र वरती क्लिक करा.

3. REPORTS तयार करण्यसाठी राज्य, वर्ष, जिल्हा, गाव आणि पंचायत हि सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर “Proceed” वरती क्लिक करा

Panchayat Samiti Yojana
Panchayat Samiti Yojana

4. त्यानंतर R5. IPPE मध्ये List Of Work वरती क्लिक करा मग तुमचासमोर कामाचा वर्ग निवडा आणि वर्ष निवडायला येईल. निवडल्यावर तुमचा समोर सर्व माहिती येईल त्यामध्ये तुमचे नाव शोधायचे आहे.

Leave a Comment