नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेळी मेंढी पालन योजना [Sheli Mendhi Palan Yojana] या विषयावर चर्चा करणार आहोत. या योजनेतून जवळपास 1 लाख रुपये पर्यंत रक्कम मिळू शकते त्यामध्ये सरकार आपल्याला 50% ते 75% पर्यंत अनुदान देते. या योजनेचा लाभ सर्व शेतकरी आणि इतर माणसे घेवू शकतात त्यासाठी पात्रता काय आहे? या बद्दल सर्व माहिती आपण जाणून घेऊया व अधिक नवीन नवीन योजनाची माहिती जाणून घेण्यासाठी नवीन जाहिरात वेबसाईट वरती तपासा.
Sheli Mendhi Palan Yojana 2024
Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra: महाराष्ट्र शासनामार्फत इच्छुक आणि लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आणि इतर नागरिकांसाठी शेळी व मेंढी पालन योजना जाहीर केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या लेखामधून आपण अर्ज कसा करावा, या योजनाचा लाभ कोण घेऊ शकतो, आणि कोण-कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत.
योजनेचे नाव | शेळी मेंढी पालन योजना २०२४ |
कोणाकडून योजना आहे? | महाराष्ट्र शासनाकडून ही योजना राबवण्यात आली आहे |
शेळी व मेंढी योजनेसाठी लाभार्थी | दारिद्र्यरेषेतील शेतकरी, महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार |
अनुदान किती? | 50% ते 75% पर्यंत |
अर्ज प्रक्रीर्या | ऑफलाईन किंवा ऑनलाईन |
Sheli & Mendhi Anudan Yojana Maharashtra
शेळी मेंढी योजना मध्ये शेतकऱ्यांना 20 मेंढ्या आणि 1 नर मेंढा एकूण 21 मेंढ्याचे गट वाटप मिळणार आहेत. या योजनेमध्ये लाभार्थी इच्छुक असतील त्यांनी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. ज्या शेतकऱ्याचे नाव रेशनकार्ड वरती असेल अस्या एकाच अर्जदाराला या योजनेचा लाभ मिळेल.
नवीन योजना-
शेळी आणि मेंढी अनुदान योजनाचे फायदे
- शेळी व मेंढी पालन योजनेचे हक्कदार दारिद्र्यरेषेतील शेतकरी, महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार आहे.
- या योजना लाभ फक्त महाराष्ट्रामध्ये राहणारा रहिवासी शेतकरी/ नागरिक घेऊ शकतो.
- भटक्या-जमाती प्रवर्गासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल. स्वतः ची जमीन असेल किंवा नसेल तरी सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल.
- केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार अंतर्गत DBT चा माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल.
- शेळी, मेंढी योजना 2024 या योजनेमध्ये 75% अनुदान सरकार मार्फत देण्यात येईल.
महाराष्ट्र शेळी आणि मेंढी पालन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
शेळी व मेंढी पालन योजना साठी लागणारी कागदपत्राची यादी खाली दिलेली आहे:
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
- दारिद्रयरेषेखाली असल्याचा दाखला
- ७/१२ व ८-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ८
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
- जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
- बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
- स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डची सत्यप्रत
- अपत्य दाखला (ग्राम पंचायत यांचा)
- रेशनकार्ड
- बँक खाते
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर आणि इमेल
शेळी व मेंढी पालन अर्ज पद्धत- Sheli Mendhi Palan Yojana Apply Method
ऑफलाईन अर्ज कसा करावा:
ज्या शेतकऱ्यांना मोबाईल वापरता येत नसेल किंवा अर्ज ऑनलाईन कसा भरायचा हे माहित नसल्यात खाली शेळी व मेंढी योजनासाठी अर्जाचा नमुना दिला आहे त्याची प्रत काढून अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती बरोबर भरून झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडावी. लागणारी कागदपत्रेची यादी वरती दिलेली आहे. अर्ज तयार झाल्यानंतर तुम्ही पंचायत समिती मध्ये हा अर्ज जमा करा. पुढची प्रक्रीर्या काय आहे त्याची सर्व माहिती पंचायत समिती कडून देण्यात येईल.
Sheli Mendhi Palan Yojana Form PDF 2024– Click Here.
ऑनलाईन अर्ज कसा करावा:
सर्व प्रथम ज्या शेतकऱ्यांचे शिक्षण झाले असेल किंवा त्यांना मोबाईल वापरता येत असेल तर तुम्ही अर्ज मोबाईल मध्ये सुद्धा भरू शकता. अर्ज कसा भरावा या बद्दल सर्व माहिती दिलेली आहे.
- सर्वात अगोदर जर मोबाईल मध्ये अर्ज भरणार आहात तर “Mahamesh” हा App डाऊनलोड करून घ्या.
- जर तुम्ही अर्ज वेबसाईट वरून भरायचे असेल तर www.mahamesh.org या संकेतस्थळावर जावून भरायचे आहे आणि पुढची प्रक्रीया सारखीच असणार आहे.
जर शेतकरी पहिल्यांदा अर्ज करत असेल तर त्यासाठी सर्वात अगोदर नवीन नोंदणी करावी लागेल. त्यांनतर तुमचा समोर बाबी सूचना येईल ती सूचना पूर्ण वाचा कारण अर्जापुर्वी वाचणे खूप महत्वाचे आहे.
नवीन नोंदणी करण्यासाठी शेतकरी अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरा. जसे कि अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक, राहणारा पत्ता, आणि बँक बद्दल माहिती तसेच इतर माहिती पूर्ण भरून नंतर नवीन नोंदणी वरती क्लिक करा.
अर्जाची नोंदणी झाल्यावर तुमचा समोर योजना निवडायला पर्याय येईल त्यामध्ये विविध योजनेची यादी येईल त्यातून तुम्हाला कोणती आवडते ती निवडून next वरती क्लिक करून शेवटची माहिती विचारली जाईल की तुमचाकडे सद्यस्थितीत मेंढ्या आहेत की नाही तर त्यामध्ये होय हे पर्याय निवडा आणि अर्ज जमा करा.
या प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता जर ऑनलाईन अर्ज करायला कठीण वाटत असल्यास ऑफलाईन सुद्धा अर्ज करू शकता त्यासाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे.