महाराष्ट्र सरकार द्वारे महाराष्ट्रातील फक्त युवकांसाठी Maharashtra Berojgari Bhatta Yojana हि राबवण्यात आलेली आहे तर या योजनेतून जे बेरोजगार युवक आहेत त्यांना सरकार कडून दर महिन्याला 5,000 हजार रुपये एवढी रक्कम देणार आहे. परंतु महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायला लागणार आहे.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
आजचा लेखामध्ये आपण महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना बद्दल चर्चा करणार आहेत. मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा नोकरी मिळत नसेल आणि तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तुम्ही घरीच आहेत तर तुमचासाठी हि खूप चांगली संधी आहे या योजनेतून तुम्हाला सरकार महिन्याला पाच हजार रुपये देणार आहे. परंतु यासाठी काही नियम आणि पात्रता सुद्धा आहेत.
1. पात्रता
1. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना हि फक्त महाराष्ट्र राज्य मध्येच राबवण्यात येणार आहे त्यामुळे अर्जदारा हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2. अर्जदाराचे शिक्षण कमीत कमी 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त B.SC, B.COM, B.A शिक्षण झालेले पाहिजे.
3. अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे या कमीत काम २१ वर्ष आणि जास्तीत जास्त ३५ वर्ष एवढे पाहिजे. अधिक किंवा कमी वयाचे उमेदवार अर्ज करू शकत नाही.
4. ज्या उमेदवाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच अर्ज करू शकता.
5. अर्जदाराकडे नोकरी मिळण्यासारखी पदवी नसावी.
6. तुमचा कडे कोणतीही सरकारी किंवा खाजगी नोकरी नसावी तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
हे पण वाचा:
लाडकी बहिण घरकुल योजना GR.
पंचायत समिती योजना बद्दल संपूर्ण माहिती.
2. रक्कम
ज्या युवकांचा अर्ज महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनासाठी मंजूर झालेला आहे त्यांना दर महिन्याला 5,000 रुपये त्यांचा बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. हे पैसे महाराष्ट्र सरकार द्वारे देण्यात येतील आणि या पैसाचा वापर चांगल्या पद्धतीने करा कारण तुमचा मदतीसाठी सरकार मदत करतो. या पैशातून तुम्ही नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा.
3. कागदपत्रे
ज्या युवकांना महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यांचा कडे खाली दिलेली सर्व कागदपत्रे असायला पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- तुमचा आधार कार्ड
- तुमचा पॅनकार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार सोबत लिंक मोबाइल नंबर
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्र
Maharashtra Berojgari Bhatta Yojana Online Form
ज्या उमेदवाराचे शिक्षण पूर्ण झालेले आहे तरी सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही असा युवकांनी महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ नक्की घ्यायचा आहे कारण या योजनेतून सरकार तुमचा मदतीसाठी दर महिन्याला तुमचा बँक खात्यात 5,000 रुपये रक्कम टाकणार आहे त्यामुळे हि संधी सोडू नका. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
1. सर्व प्रथम युवकांनी या योजनेसाठी लागणारी पात्रता (शिक्षण, वय, आणि इतर) तसेच सर्व कागदपत्रे तपासून घ्यायची आहेत.
2. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावे लागणार आहे.
3. इथे गेल्यावर तुम्हाला एक नवीन पेज उघड होईल तर तिथे तुम्हाला सर्वात अगोदर तुमची नोदणी करायची आहे जर कोणी अगोदरच या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर त्यांनी लोगिन वरती क्लिक करायचं आहे.

4. नोंदणी वरती क्लिक केल्यावर नवीन पेज येईल त्यामध्ये तुमचे नाव, जन्म दिनांक, लिंग आणि आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर टाकायचे आहे.
5. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर वरती एक OTP येईल ते टाकून घ्यायचे आहे आणि आणि नंतर इतर माहिती भरून घ्या तसेच विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि शेवटी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर सबमिट बटन वरती क्लिक करा.
6. तुमची नोंदणी झाल्यावर लोगिन वरती क्लिक करा. तिथे तुम्हाला आधार कार्ड नंबर किंवा नोंदणी नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड मध्ये तुम्ही टाकलेला पासवर्ड टाका आणि मग लोगिन वरती क्लिक करा.
असा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना (Maharashtra Berojgari Bhatta Yojana) साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता परंतु कधी कधी हि वेबसाईट चालू होत नाही त्यामुळे तुम्ही थोड्या वेळाने परत तपासू शकता.