महाराष्ट्र शासनाकडून Biyane Tokan Yantra Yojana शेतकरी माणसांसाठी राबवण्यात आली आहे हे या योजनेतून शेतकरी माणसांना मदत व्हावी म्हणून सरकार कडून बियाणे टोकन यंत्र योजना काढली आहे. बियाणे टिकण यंत्र अवजाराची किंमान जास्त आहे त्यामुळे सर्व शेतकरी हे अवजार घेऊ शकत नाही म्हणून Biyane Tokan Yantra Anudan Yojana द्वारे महाराष्ट्र सरकार ने 50% चा अनुदान दिला आहे. ज्या शेतकऱ्यांना बियाणे यंत्र साठी सरकार कडून लाभ घ्यायचा आहे त्यांनी महा DBT या संकेतस्थळावर जावून आपल्या अर्जाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे.
योजनेचे नाव | बियाणे टोकन यंत्र योजना |
योजनेचे राज्य | हि योजना महाराष्ट्र मध्ये आहे |
लाभार्थी | महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी |
योजनेचे अनुदान | महाराष्ट्र सरकार कडून 50% अनुदान मिळेल |
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
Biyane Tokan Yantra Yojana 2024
महाराष्ट्र शेतकरी माणसांसाठी बियाणे यंत्र खरीदी साठी सरकार कडून पैसे मिळणार आहेत. जर हे अवजार कोणत्याही दुकानातून खरीदी केल्यास 7 हजार ते 9 हजार पर्यत भेटते. पण महाराष्ट्र सरकार ने 50% अनुदान देण्याचे निर्णय घेतला आहे. सर्व शेतकरी माणसांना विनंती आहे कि त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. बियाणे टोकन यंत्र हे शेतकऱ्यांसाठी खूप कामाचे आहे कारण या अवजाराने कामे खूप लवकर होतात आणि वेळ सुद्धा बचत होते. लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज कसा करावा आणि कोण-कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि इतर सर्व महत्वाची माहिती या लेखाचा माध्यमातून सांगायचं प्रयत्न केला आहे. येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व नवीन योजनांची माहिती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी navinjahirat.com या संकेतस्थळावर जाऊन तपासा.
बियाणे टोकण यंत्र योजनाची सविस्तर माहिती
Biyane Tokan Yantra Subsidy Scheme मध्ये अवजार घेण्यासाठी महाराष्ट्र शासन मार्फत 50 टक्के सबसिडी मिळणार आहे. या योजनेचे काही नियम व अट खाली दिलेली आहेत.
1. बियाणे टोकन योजना साठी शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे.
2. शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन पाहिजे.
3. बियाणे टोकन यंत्राचा वापर खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम साठी खूप कामात येणार आहे.
4. बियाणे टोकन यात्राच वापर करून शेतकरी आपले कामे लवकर करू शकतो आणि त्याचाकडे पैसे सुद्धा वाचतील कारण जास्त शेती असल्यामुळे आपण शेतात काम करण्यासाठी मजूर घेतो आणि त्यांना पैसे देतो परंतु आता या यंत्राचा वापर करून आपली कामे सोपे होतील.
5. बियाणे टोकन यंत्राचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर ऑनलाईन अर्ज करावे लागेल, अर्ज कसा करायचा तत्याबद्दल माहिती खाली दिलेली आहे.
6. या योजनेची शुल्क २३.६० रुपये शेतकरी माणसांकडून घेतली जाणार आहे आणि ही रक्कम ऑनलाईन द्वारे पेमेंट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला शुल्काची पावती दिली जाईल.
Biyane Tokan Yantra Anudan Yojana Documents- कागदपत्रे
- मोबाईल नंबर [OTP साठी]
- तुमची इमेल [नवीन नोंदणी करण्यासाठी आवश्यक]
- स्वतःचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- 7/12 उतारा
- जातीचा दाखला
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- बँक खाते
MahaDBT Biyane Token Yantra Application Process
Biyane Token Yantra योजनेसाठी अर्ज कसा भरावा? सर्व प्रथम अर्ज करण्यासाठी MahaDBT चा अधिकृत वेबसाईट वरती जा. तिथे लोगिन करण्यासाठी येईल परंतु तुम्ही नोंदणी केली नाही त्यामुळे अगोदर नोंदणी करून घ्या.
अर्जाची नवीन नोंदणीसाठी तुमचे नाव, युझर नेम, पासवर्ड, इमेल आणि मोबाईल नंबर टाका. त्यानंतर इमेल वरती आणि मोबाईल नंबर वरती OTP येईल ते टाकून नोंदणी करा.
नोंदणी करून झाल्यास लोगिन साठी विचारल जाईल. लोगिन हे दोन प्रकाराने केले जाईल 1. तुमचा युझर नेम आणि 2. आधार नंबर वरून. नोंदणी करतानी जे युझरनेम आणि पासवर्ड टाकले ते टाकून लोगिन वरती क्लिक करा.
लोगिन केल्या नंतर आपण शेतकरी गट/FPO/ संस्था म्हणून अर्ज करता का तिथे हो किंवा नाय हे पर्याय निवडा त्यानंतर पुढची प्रक्रीर्या मध्ये स्वताची सविस्तर माहिती भरा.
त्यानंतर फार्मर ग्रूप ची माहिती पूर्ण भरावी त्यामध्ये ग्रुपचे नाव आणि पत्ता या बद्दल सर्व माहिती रिकाम्या जागी माहिती भरून घ्या.
शेवटी तुमचा बँक खात्याची माहिती बरोबर भरा. माहिती भरताना बँकचे नाव, स्वताचे नाव, IFSC कोड आणि बँक ची शाखा ही माहिती बरोबर भरा.
महाराष्ट्र शासनाचे पहिल्यांदाच लाभ घेत असतील तर 23.60 रुपये अर्जाची शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सर्व माहिती भरून झाल्यास अर्ज जमा करा. जर तुमचे अर्ज महाराष्ट्र शासनाद्वारे स्वीकारले जाईल तेव्हा मोबाईल नंबर वरती SMS येईल.