सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Maharashtra – सोलर पंप योजना महाराष्ट्र 2025

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Maharashtra: नमस्कार, आज आपण सोलर पंप योजना विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर सोलर पंप योजना यालाच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा कुसुम सोलर पंप योजना असे सुद्धा म्हणतात. सोलर पंप योजना हि भारत सरकार कडून राबण्यात आली होती या योजनेतून महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री सोलर पंप योजनाची संपूर्ण माहिती जसे कि अर्ज कसा करायचा, रक्कम किती भरावी लागणार तसेच फायदे काय आहेत या बाबत सर्व माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी पूर्ण माहिती वाचून नंतर ऑनलाईन अर्ज करा.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Maharashtra

सोलर पंप योजना ला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असे सुद्धा म्हणतात. या योजनेतून शेतकऱ्यांना किती नावावर जागा आहे त्याप्रमाणे एचपी मिळणार आहे. जर जागा 2.5 एकर असेल तर 3 एचपी, जमीन 5 एकर असेल तर 5 एचपी आणि जमीन 5 एकर पेक्षा अधिक असल्यास 7.5 एचपी या प्रकारे मिळणार आहे. तसेच रक्कम सुद्धा किती एचपी लागू झाली आहे त्याच नुसार भरावी लागणार आहे. या बद्दल पूर्ण माहिती खाली बघा.

एकूण जमीनएकूण HPअनुसूचित जमाती शेकरी – 5% रक्कमइतर लाभार्थी – 10% रक्कम
3.5 एकर3 HPरु. 8 हजार 280रु. 16 हजार 560
5 एकर5 HPरु. 12 हजार 355रु. 24 हजार 710
5 एकर पेक्षा जास्त7.5 HPरु. 16 हजार 728रु. 33 हजार 455

सोलर पंप योजना महाराष्ट्र 2024

महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना सोलर पंप ची खूप गरज असते कारण या सोलर पंप चा उपयोग करून आपण महावितरण वीज वाचवू सकतो. तसेच या योजनेचा माध्यमातून वीज साठी येणार खर्च कमी होईल त्यासाठी हि चांगली योजना सरकारने राबवली आहे. सौर कृषी पंप किंवा सोलर पंप चा उपयोग आपण बोरवेल किंवा विहीर मध्ये मोटर साठी उर्जा लागते त्यासाठी उपयोग होणार आहे. अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना 95% अनुदान मिळणार आहे व इतर लाभार्थी साठी 90% अनुदान दिले जाणार आहे म्हणजे अनुसूचित जमाती उमेदवारांना फक्त 5% रक्कम भरायची आहे आणि इतर उमेदवारांनी 10% रक्कम भरावी लागणार आहे. परंतु कुसुम सोलर पंप योजनाचा लाभ त्यांनाच घेता येणार आहे ज्याचाकडे स्वतः ची जमीन असेल आणि ती जमीन शेतकऱ्याचा नावावर असायला हवी.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना रक्कम आणि अनुदान

शेतकरी माणसांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनातून अनुसूचित जाती साठी 95% अनुदान आणि इतर शेतकऱ्यांसाठी 90% अनुदान सरकार तर्फे मिळणार आहे. तर अनुसूचित जमाती साठी 5% रक्कम भरावी लागणार आहे व इतर शेतकऱ्यांना 10% रक्कम भरायची आहे. सोलर पंप योजनातून शेतकऱ्यांना 3 टप्पे नुसार रक्कम देण्यात येणार आहे पहिला टप्पा 25,000, दुसरा टप्पा 50,000 आणि तिसरा टप्पा 25,000 या प्रमाणे एकूण 1 लाख रक्कम सरकार कडून सौर कृषी पंप बसवण्यासाठी मिळणार आहेत. जर सरकार कडून सौर कृषी पंप बसवून घेतल्यावर 5 वर्षाची गॅरंटी मिळेल.

कुसुम सोलर पंप योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड, रेशनकार्ड, फोटो
  • मोबाईल नंबर, इमेल आय डी
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • आधार लिंक बँक खाते
  • 7/12 उतारा

Solar pump yojana maharashtra 2024 online registration

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साठी शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. हि योजना सरकार कडून आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाईट वरती जाऊन सर्वात अगोदर अर्जाची नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला स्वतःची विचारलेली सर्व माहिती टाकून घ्या आणि त्यानंतर अर्जाची नोंदणी करा. अर्ज कसा भरायचा ते खाली पूर्ण माहिती दिलेली आहे.

Maharashtra Solar Pump Yojana Online application Login

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्जाची नोंदणी करून झाल्यावर लोगिन करायचे आहे. लोगिन झाल्यावर तुमचा समोर अर्ज भरायला येईल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती बरोबर भरावी तसेच आवश्यक लागणारी कागदपत्रे सुद्धा अपलोड करावीत. या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात त्याची यादी वरती दिलेली आहे. अर्जामध्ये सर्व माहिती भरून झाल्यास सबमिट वरती क्लिक करा. अशा प्रकारे या योजनेसाठी अर्ज भरायचा आहे.

Leave a Comment