Ladki Bahin Yojana Updates नमस्कार, महाराष्ट्र सरकार मार्फत लाडकी बहिण योजना साठी खूप मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. सरकार लाडकी बहिण योजनेमध्ये मिळालेले पैसे परत घेणार का? तर याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सरकार कडून नियम आणि अटी आल्या होत्या त्यामध्ये लाडकी बहिण योजनासाठी पात्रता सांगितली होती परंतु ज्या महिलांनी या योजनेचा ग़ैरफायदा घेतला आहे त्यांचाकडून लाडकी बहिण योजनेतून मिळालेले पैसे परत घेणार आहे असी घोषणा केली होती.
महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिण योजना 28 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आली होती. लाडकी बहिण योजनातून दर महिना महिलांना १५०० देण्यात येतात परंतु महाराष्ट्र शासन कडून नियम न पाळलेल्या महिलांना आता नवीन हप्ता मिळणार नाही आणि ज्या महिला सरकारी नोकरी करतात किंवा ज्या महिलांचा नावावर चार चाकी वाहन आहे अशा महिलांना सुद्धा पुढचा हप्ता मिळणार नाही.
लाडकी बहिण योजना मध्ये मिळालेले पैसे परत घेणार का?
महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिण योजना हि बरीब किंवा पैशाची गरज असलेल्या महिलांसाठी काढली होती परंतु या योजनेचा लाभ अपात्र महिलांनी सुद्धा घेतला आहे तर त्यांचाकडून सरकार पैसे परत हेणार आहे असी बातमी महाराष्ट्र सरकार कडून आली आहे.
लाडकी बहिण योजना पात्र
लाडकी बहिण योजना अपात्र
या अपात्र मध्ये महिला येतात त्यांचाकडून सरकार पैसे वसुली करणार आहे असे महाराष्ट्र शासन कडून सांगितले गेले आहे.