नमस्कार, ज्या अर्जदारांनी घरकुल मिळवण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले होते तर त्यांची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तुमचे सुद्धा Gharkul Manjur Yadi मध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार रुपये रक्कम सरकार कडून मिळेल. महाराष्ट्राची घरकुल मंजूर यादी हि ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेली आहे त्यामळे हि घरकुल यादी तुम्ही घरी बसून सुद्धा तपासू शकता.
महाराष्ट्राची घरकुल मंजूर यादी माहिती
जर तुम्हाला ग्रामपंचायत घरकुल योजना मंजूर यादी तपासता येत नसेल तर आजचा लेखामध्ये आम्ही तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने प्रक्रिया सांगणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ज्यांनी अर्ज केले होते त्यांची घरकुल यादी हि जानेवारी 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेली होती आणि हि घरकुल मंजूर यादी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये तुम्ही घरी बसून मोबाईल मध्ये सुद्धा तुमचे नाव तपासू शकता.
हे पण वाचा:
महाराष्ट्र लाडकी बहिण घरकुल योजना GR, अर्ज, कागदपत्रे.
लाडकी बहिण घरकुल योजना GR.
घरकुल योजना मंजूर यादी मध्ये नाव आलेल्या अर्जदारांना घरकुल बांधकाम साठी सरकार कडून 1 लाख 20 हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे आणि हि रक्कम तुमचा सरळ बँक खात्यात येणार आहे. घरकुलासाठी मिळालेली रक्कम फक्त घरकुल बांधकाम साठी वापरायचे आहेत.
Grampanchayat Gharkul Manjur Yadi 2025
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या अर्जदारांचे घरकुल यादी मध्ये नाव तपासण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली पूर्ण माहिती वाचायची आहे. जर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले असेल तरच तुमचे नाव यादी मध्ये येणार आहे.
1. घरकुल मंजूर यादी हि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता त्यासाठी तुम्हाला www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या संकेतस्थळावर जावे लागणार आहे.
2. या लिंक वर क्लिक केल्यावर तुमचा समोर एक नवीन पेज उघड होईल त्यामध्ये डाव्या बाजूने “Selection filters” हे दिसणार आहे.

3. त्यामध्ये तुम्हाला “All State” हे दिसेल त्यावर क्लिक करून महाराष्ट्र राज्य निवडा, जर तुम्ही महाराष्ट्राची घरकुल मंजूर यादी पहायचे असेल तर.
4. त्यानंतर खाली तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व जिल्हे दिसणार आहेत तर तुम्हाला कोणत्या जिल्हाची घरकुल यादी बघायची आहे तो जिल्हा निवडा.
5. जिल्हा निवडल्यावर नंतर तुमचे शहर निवडा आणि त्यानंतर तुमचे गावाचे नाव निवडा.
6. त्याखाली तुम्ही अर्ज केलेलं सन निवडायचे आहे त्यामध्ये तुम्ही सन २०२४-२०२५ हे निवडायचे आहे तर हे सन तुम्हाला एकदम खाली पाहायला मिळणार आहे.
7. शेवटी तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केले होते तर “PRADHAN MANTRI AWAS YOJANA-GRAMIN” हि योजना निवडायची आहे.
8. खाली तुम्हाला एक chaptcha येईल तो भरायला लागेल आणि मग सबमिट वरती क्लिक करा.
9. तुमचा समोत तुमचा गावाची घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांचे नावे येतील आणि त्या यादी मध्ये भरपूर नावे असणार आहेत त्यामळे तुमचे नाव काळजीपूर्वक बघा.

असा प्रकारे तुम्ही घरकुल मंजूर यादी (Gharkul Manjur Yadi 2025) घरी बसून तपासू शकता. तुमचे नाव यादी मध्ये आलेलं असेल तर तुम्ही तुमचा ग्रामपंचायत मध्ये जावून पुढची प्रक्रिया विचारा. जर यादी बघतानी काही अडचणी आल्यास आमचा सोबत संपर्क करा.