SSC GD Constable Bharti 2024 – एसएससी GD कॉन्स्टेबल साठी एकूण 39 हजार 481 पदांची भरती

SSC GD Constable Bharti 2024 – Advertise Notification PDF

SSC GD Constable Bharti 2024 – SSC (Staff Selection Commission) मार्फत दिनांक 05-09-2024 रोजी GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे. GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी एकूण 39481 पदांची रिक्त जागा आहे. त्यासाठी उमेदवाराचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण पाहिजे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी इच्छुक व पात्र महिला/पुरुषांनी अर्जाची नोंदणी करण्यासाठी www.ssc.gov.in/login संकेतस्थळावर जावून अर्ज भरायचे आहे.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्जाची सुरुवात दिनांक 05-09-2024 ते 14-10-2024 रोजी पर्यंत ओनलाईन अर्ज स्वीकारले जातील. कर्मचारी निवड आयोगामार्फत हि खूप मोठी नोकरीची संधी आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारतचे नागरिक या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

एसएससी भरती मध्ये एकूण 39 हजार 481 पदांची संख्या जीडी कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पद साठी जागा उपलब्ध आहेत. या सर्व पदांसाठी ओनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे व आणि परीक्षा बहुतेक जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना विनंती आहे कि त्यांनी सर्वात अगोदर अधिकृत कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचून घ्यावी आणि अधिक माहितीसाठी SSC (Staff Selection Commission) चा अधिकृत वेबसाईट वर जावून तपासून घ्या.

SSC GD Constable Recruitment 2024

विभागाचे नाव Staff Selection Commission (SSC)
पद संख्या39 हजार 481
पदाचे नाव GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
अर्ज करण्याची पद्धतओनलाईन
अंतिम तारीख14 ऑक्टोबर 2024
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत

Staff Selection Commission Bharti Apply Link & Last Dates

जाहिरातNotification PDF
अर्जाची लिंकApply Now
SSC अधिकृत वेबसाईटClick Here
नोकरी अपडेटnavinjahirat.com
अर्जाची सुरूवातीच दिनांक 05/09/2024
अंतिम तारीख14/10/2024
परीक्षा फी अंतिम तारीख15/10/2024
परीक्षा दिनांकजानेवारी – फेब्रुवारी

SSC GD Constable Bharti Apply Step By Step Process

  • एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  • अर्जदार हा शिक्षण आणि वयोमर्यादा मध्ये पात्र पाहिजे.
  • अर्ज ओनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून भरायचा आहे.
  • शेवटची दिनांक 14-102024 रोजी SSC अंतर्गत जाहीर झाली आहे.
  • आवश्यक संपूर्ण कागदपत्रे SSC चा पोर्टल वर अपलोड करावीत.
  • परीक्षेचा वेळापत्रक आणि शारीरिक चाचणीची माहिती अधिकृत वेबसाईट वर अपडेट केली जाईल.

SSC GD Constable Vacancy Information

पदाचे नावएकूण पदांची संख्या
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)39 हजार 481 पद
SSC GD Constable Bharti 2024
SSC GD Constable Vacancy Information

SSC GD Constable Bharti Education Qualification

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्जदाराचे शिक्षण फक्त 10 वी उत्तीर्ण असायला पाहिजे.

SSC GD Constable Recruitment Age Limit 2024

उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 23 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. SC आणि ST जातींसाठी 05 वर्ष शूट आहे व OBC जात साठी 03 वर्ष शूट आहे.

SSC GD Constable Bharti Selection Process

SSC GD Constable भरतीसाठी ज्या उमेदवाराने ओनलाईन अर्ज केले आहेत त्यांना ओनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे आणि हि परीक्षा जानेवारी – फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल. आणि शारीरिक चाचणी घेतली जाईल त्यासाठी अधिक माहिती खाली दिलेली आहे.

SSC GD Constable Bharti Physical Test
SSC GD Constable Bharti Physical Test

Staff Selection Commission Bharti Exam Fee

पात्र उमेदवारांनी ओनलाईन पद्धतीने अर्ज भरून झाल्यास परीक्षा शुल्क ओनलाईन पद्धतीने रक्कम भरायची आहे. तर SC/ST/महिला साठी कोणतीही परीक्षेची रक्कम घेतली जाणार नाही आणि General/OBC अर्जदाराकडून मात्र 100 रुपये परीक्षा शुल्क घेतली जाणार आहे.

SSC GD Constable Recruitment Salary

SSC GD Constable साठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे लेवल प्रमाणे मिळणार आहे. Level-1 मध्ये 18 हजार रुपये ते 56 हजार 800 रुपये आणि Level-3 मध्ये रक्कम 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये या प्रमाणे वेतन मिळणार आहे.

Leave a Comment

मित्रांनो, नोकरीसाठी WhatsApp ग्रूप ला जॉईन करा.