सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

MSRTC भरती 2025 : एसटी महामंडळात मेगा भरती सुरू! चालक, वाहक, मेकॅनिक, क्लार्क यांना सुवर्णसंधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर! रत्नागिरी विभागात विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत ४३४ शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) अंतर्गत राबवली जाणार असून प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर करावा तसेच अर्ज प्रिंटआउट व आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज रत्नागिरी एसटी विभाग कार्यालयात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत जमा करणे बंधनकारक आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

पदांची माहिती

रत्नागिरी विभागात जाहीर झालेल्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे –

  • यांत्रिक डिझेल – 110
  • यांत्रिक मोटारगाडी – 110
  • बीजतंत्री – 60
  • पत्राकारागीर – 44
  • सांधाता – 25
  • कातारी – 10
  • यंत्र कारागीर – 10
  • रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग – 5
  • साठा जोडारी – 44
  • सुतार – 4
  • रंगारी – 10
  • शिवणकाम – 2

एकूण पदसंख्या – ४३४

इतर रिक्त पदांचा आढावा

सध्या MSRTC मध्ये चालक, वाहक, लिपिक, यांत्रिक, वाहतूक नियंत्रक अशा एकूण ९४० पदांवर मोठी रिक्तता आहे. चालकांच्या १,९३६ मंजूर पदांपैकी ६७७ पदे रिक्त असून, वाहकांच्या १,९८३ पदांपैकी ५७२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बस वेळेवर धावत नाहीत, प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते.

कोल्हापूर विभागासह अनेक आगारांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आहे. यासाठी महामंडळाने शासनाकडे भरती प्रस्ताव पाठविला असून, लवकरच चालक, वाहक, क्लार्क व मेकॅनिक या पदांसाठी मोठी भरती जाहीर होण्याची शक्यता आहे.

पात्रता व वयोमर्यादा

  • शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण, ITI (पदाच्या आवश्यकतेनुसार)
  • वयोमर्यादा: २४ ते ३८ वर्षे
  • ड्रायव्हिंग लायसन्स: चालक पदांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक

वेतनमान

शिकाऊ उमेदवारांसाठी मासिक मानधन सुमारे १०,०००/- रुपये असेल. कायमस्वरूपी पदांवर नियुक्ती झाल्यास वेतनमान ₹8,000 ते ₹26,783/- (पदनिहाय) इतके असेल.

अर्ज प्रक्रिया

  1. उमेदवारांनी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.org या पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करावा.
  2. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह रत्नागिरी विभागीय कार्यालयात सादर करावा.
  3. अर्जाची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२५

कर्मचारी संघटनांची मागणी

स्थानिक संघटना आणि प्रवासी संघटनांनी कोकण विभागातील भूमिपुत्रांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे. तसेच चालक-वाहकांच्या रिक्त पदांमुळे बससेवा विस्कळीत होत असल्याने लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी वारंवार केली जात आहे.

ताजे अपडेट – महागाई भत्ता वाढ

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारने महागाई भत्ता ४६% वरून ५३% करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दरमहा सुमारे १९ कोटी रुपयांचा आर्थिक भार महामंडळावर वाढेल. पण कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून त्याचा फायदा हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे.

महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • शैक्षणिक गुणपत्रिका
  • ड्रायव्हिंग लायसन्स (चालक पदासाठी)
  • पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी

महत्वाच्या लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथेयेथे क्लिक करा
MSRTC अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

MSRTC भरती 2025 ही महाराष्ट्रातील युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ४३४ पदे, तर आगामी काळात चालक-वाहक, क्लार्क, यांत्रिक यांसारख्या पदांसाठी हजारो जागा भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज करून ही संधी साधावी.

1 thought on “MSRTC भरती 2025 : एसटी महामंडळात मेगा भरती सुरू! चालक, वाहक, मेकॅनिक, क्लार्क यांना सुवर्णसंधी”

Leave a Comment