सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

सेंट्रल वेअरहाउसिंग CWC मध्ये एकूण 179 जागा विविध पदांसाठी, नवीन नोकरीची जाहिरात – Central Warehousing Corporation (CWC) Bharti 2025

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

CWC Bharti 2025 मध्ये सेंट्रल वेअरहाउसिंग CWC कडून एकूण 179 पदांची जागा विविध पदांसाठी निघाली आहे. हि भरती संपूर्ण भारतामध्ये होणार आहे त्यासाठी ST, SC, OBC & GEN या जमातीचा विध्यार्थांसाठी जागा उपलब्ध आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन मागवण्यात आलेले आहेत तर अर्जाची सुरुवात दिनांक 14 डिसेंबर 2024 ते अंतिम तारीख 12 जानेवारी 2025 रोजी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती वाचून नंतर आपल्या अर्जाची नोंदणी करायची आहे. अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पात्रता काय आहे आणि मूळ जाहिरात pdf बद्दल माहिती खाली आहे.

Central Warehousing Corporation (CWC) Bharti

विभागाचे नावसेंट्रल वेअरहाउसिंग CWC विभाग
जाहिरातीचे नावCWC Bharti 2024
पदांचे नावेविविध पदे (पदानुसार माहिती खाली आहे)
एकूण जागा179 पदे
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज भरायला सुरुवात दि.14 डिसेंबर 2024
शेवटची दि.12 जानेवारी 2025
Central Warehousing Corporation (CWC) Bharti 2025
Central Warehousing Corporation (CWC) Bharti 2025

पदे आणि पदांची संख्या :

पद क्र. 1व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सामान्य)40 जागा
पद क्र. 2व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक)13 जागा
पद क्र. 3लेखापाल09 जागा
पद क्र. 4अधीक्षक (सामान्य)22 जागा
पद क्र. 5कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक81 जागा
पद क्र. 6अधीक्षक (सामान्य) – SRD (NE)02 जागा
पद क्र. 7कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- SRD (NE)10 जागा
पद क्र. 8कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- SRD (UT of Ladakh)02 जागा
एकूण पदे179 जागा

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराचे शिक्षण हे पदानुसार असायला पाहिजे शिक्षण विषयी माहिती खाली तपासून घ्या.

  1. मॅनेजमेंट ट्रेनी (General) : मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठाकडून प्रथम श्रेणी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, कार्मिक व्यवस्थापन किंवा मानव संसाधन किंवा औद्योगिक संबंध किंवा विपणन व्यवस्थापन किंवा पुरवठा शृंखला यामधील स्पेशलायझेशनसह पदवी.
  2. मॅनेजमेंट ट्रेनी (Technical) : कीटकशास्त्र किंवा सूक्ष्म-जीवशास्त्र किंवा जैव-रसायनशास्त्रासह कृषी विषयातील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
  3. अकाउंटंट : B.Com किंवा BA ( वाणिज्य ) किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट्स अँड वर्क्स अकाउंटंट्स किंवा भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स डिपार्टमेंटचे SAS अकाउंटंट्स इंडस्ट्रियल / कमर्शियल / डिपार्टमेंटल अंडरटेकिंग्समधील अकाउंट्सची देखरेख आणि ऑडिटिंगमध्ये सुमारे तीन वर्षांचा अनुभव.
  4. सुपरिटेंडेंट (जनरल) : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
  5. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) आणि ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) : कृषी विषयातील पदवी किंवा प्राणीशास्त्र , रसायनशास्त्र किंवा जैव – रसायनशास्त्र या विषयांपैकी एक विषय म्हणून पदवी
  6. सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

वयाची अट :

उमेदवाराची वयाची अट किमान १८ वर्ष ते कमाल 30 वर्षा पर्यंत पाहिजे. पदानुसार वयाची अट वेगळी असणार आहे त्यामुळे पदानुसार वयाची अट मूळ जाहिरातीमध्ये दिलेले आहे.

अर्जाची फी :

  • खुला प्रवर्ग- Rs. 1,350/-
  • मागासवर्गीय- Rs. 500/-

वेतनश्रेणी (पगार) :

निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना २९ हजार ते 1 लाख ८० हजार एवढ्या पगार पदानुसार असणार आहे.

निवड प्रक्रीर्या :

ऑनलाईन अर्ज भरल्या नंतर अर्जदाराची ऑनलाईन परीक्षा आणि कागदपत्रे तपासणी केली जाणार आहे.

जाहिरात pdf आणि अर्जाची लिंक :

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जाची लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment