Mahavitaran Nanded Bharti 2025 बद्दल माहिती
महावितरण, मंडळ कार्यालय, नांदेड अंतर्गत नांदेड जिल्यामध्ये आय. टी. आय. शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात जाहीर झालेली आहे. Mahavitaran Nanded Bharti 2025 मध्ये एकूण 200 पदांची संख्या भरती केली जाणार आहे आणि हि 200 जागा हि शिकाऊ उमेदवार म्हणून भरती केली जाणार आहे. तर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी वीजतंत्री १०० व तारतंत्री १०० अशी एकूण २०० पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Mahavitaran Nanded Recruitment ची जाहिरात दिनांक ०४ जानेवारी २०२५ रोजी जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण नांदेड भरती साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायला लागणार आहे तर अर्जाची सुरुवात हि ०६ जानेवारी २०२५ पासून केली जाईल तसेच या भरतीसाठी अर्जाची ऑनलाईन शेवटची दिनांक हि १५ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत आहे. ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचे त्यांनी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचावी आणि अधिकृत जाहिरात pdf सुद्धा वाचून घ्या.
विभागाचे नाव | अधिक्षक अभियंता, महावितरण, मंडळ कार्यालय, नांदेड |
जाहिरात दिनांक | 04/01/2025 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
एकूण पदे | वीजतंत्री १०० तारतंत्री १०० |
पदांची नावे | शिकाऊ (वीजतंत्री आणि तारतंत्री) |
आस्थापना कोड | ०२१७२७००००९ |
ऑनलाईन अर्ज सुरु | ०६ जानेवारी २०२५ |
अंतिम दिनांक | १५ जानेवारी २०२५ |
वयाची अट | वयोमर्यादा १८ ते २७ वर्ष |
शैक्षणिक पात्रता | 10वी आणि ITI उत्तीर्ण |
अर्जाची शुल्क | शुल्क नाही |
नोकरी ठिकाण | नांदेड महाराष्ट्र |
भरतीची जाहिरात | click here |
ऑनलाईन अर्ज | click here |
Also Read:
Mahavitaran Nanded Recruitment 2025
अधिक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय नांदेड कडून जाहीर झालेली भरती मध्ये एकूण 200 पदे शिकाऊ पदासाठी भरती केली जाणार आहे तर या पदासाठी काय पात्रता आहे आणि इतर महत्वाची माहिती व अर्ज कशा प्रकारे भरावा या बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला खाली पाहायला मिळणार आहे.
Mahavitaran Nanded Bharti साठी नांदेड जिल्यातील राहवासी उमेदवाराला सर्व प्रथम प्राधान्य मिळणार आहे तर ज्या उमेदवाराचे वय आणि शिक्षण पात्र असेल अशा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या आस्थापना कोड ०२१७२७००००९ वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. फक्त दिनांक ०६ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील त्यानंतर कोणत्याही अर्जदाराचे विचार केला जाणार नाही.
Mahavitaran Nanded भरती मध्ये शिकाऊ पद साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता हि 10वी उत्तीर्ण आणि आय.टी.आय इलेक्ट्रिकल मध्ये पूर्ण झालेले पाहिजे आणि उमेदवार हा नांदेड जिल्यातील रहिवासी पाहिजे. या भरतीसाठी निवड सुद्धा आय टी आय मध्ये मिळालेल्या गुणानुसार मेरीट यादी बनवली जाणार आहे. नांदेड महावितरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वयोमर्यादा १८ ते २७ वर्ष, मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष शिथिलक्षम.
ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत जसे कि SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आय. टी. आय. गुणपत्रिका, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, जन्म प्रमाणपत्र, सही आणि फोटो इत्यादी. सर्वात अगोदर अर्जाची ऑनलाईन नोंदणी करायची आहे आणि तुमची माहिती बरोबर भरून घ्या तसेच चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी टाका कारण नंतरची प्रक्रीर्या हि इमेल आणि मोबाईल नंबर वरती कळवण्यात येईल.
अशा प्रकारे या लेखातून महाराष्ट्र राज्य वीज वितरण नांदेड भरतीची माहिती देण्यात आलेली आहे काही अडचणी आल्यावर आमचा सोबत संपर्क करा आणि इतर भरतीची माहिती आणि अपडेट अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येईल.