सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Mazagon Dock Bharti 2024 | माझगाव डॉक मुंबई भरती – एकूण 234 पदे, 10वी, 12वी, पदवी, ITI शिक्षण

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

माझगाव डॉक मुंबई भरती जाहिरात

माझगाव डॉक मुंबई कडून “Mazagon Dock Bharti” ची जाहिरात जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. हि भरती मुंबई शहरामध्ये होणार आहे आणि भरतीचा प्रकार हा सरकारी नोकरी आहे. Mazagon Dock Recruitment माझगाव कडून एकूण 234 विविध पदांसाठी भरती आहे. अर्जाची सुरुवात 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेले आहेत आणि शेवटची अंतिम दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी आहे. माझगाव डॉक भरती साठी 10वी, 12वी, ITI आणि पदवी शिक्षण झालेले उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. भरतीची मूळ जाहिरात, लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि अर्ज कसा करावा या बद्दल माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी पूर्ण माहिती वाचवू नंतर अर्ज करा.

Mazagon Dock Bharti Apply for 234 Posts
Mazagon Dock Bharti Apply for 234 Posts

पदे आणि पदांची संख्या

माझगाव भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 234 रिक्त पदे आहेत आणि हि पदांची यादी खालीलपणे दिलेली आहेत.

चिपर ग्राइंडर (06), संमिश्र वेल्डर (27), इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर (7), इलेक्ट्रिशियन (24), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (10), फिटर (14), गॅस कटर (10), जूनियर हिंदी अनुवादक (1), ज्युनियर ड्राफ्ट्समन (यांत्रिक) (10), जूनियर ड्रॉट्समन (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) (3), जूनियर गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (यांत्रिक) (7), जूनियर गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) (3), मिलराइट मेकॅनिक (6), मशीनिस्ट (8), जूनियर प्लॅनर एस्टिमेटर (यांत्रिक) (5), जूनियर प्लॅनर एस्टिमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) (1), रिगर (15), स्टोअर कीपर/स्टोअर कर्मचारी (8), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (25), युटिलिटी हँड (कुशल) (6), लाकडी काम तंत्रज्ञ (सुतार) (5), फायर फायटर (12), उपयुक्तता हात (अर्ध-कुशल) (18), मास्टर प्रथम वर्ग (2), अभियंता कार्य करण्याचा परवाना (1) अशा प्रकारे एकूण 234 जागा रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवारांचे शिक्षण हे पदानुसार असणर आहे तर ज्या पदासाठी अर्ज करत आहेत त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता मूळ जाहिराती मध्ये तपासून नंतर अर्ज करा. या भरतीमध्ये 10वी, 12वी, ITI आणि पदवी शिक्षण झालेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 38 वर्ष या दरम्यान वयाची अट पाहिजे.

  • SC/ST – 05 वर्ष सूट.
  • OBC – 03 वर्ष सूट.

निवड प्रक्रीर्या

ज्या अर्जदाराने ऑनलाईन फोर्म भरला आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने Written परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर Trade/Skill चाचणी घेण्यात येईल. परीक्षेमध्ये आणि चाचणी मध्ये मिळालेल्या गुणानुसार उमेदवाराची final merit यादी तयार करण्यात येईल आणि शेवटी त्यांना Original Documents तपासणी साठी बोलावले जाईल.

अर्जाची शुल्क

खुला प्रवर्ग उमेदवाराकडून रु. 100 शुल्क घेण्यात येणार आहे आणि इतर राखीव प्रवर्ग उमेदवारांना या भरतीमध्ये अर्जाची शुल्क नाही. तसेच महिलांना सुद्धा शुल्क नसणार आहे.

वेतनश्रेणी

या भारतीमधून नोकरीला लागल्यानंतर अर्जदाराला दर महिना रु. 13200 ते रु. 83180 या दरम्यान देण्यात येणार आहे. पदानुसार वेतनश्रेणी मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची सुरुवात25/11/2024
शेवटची दिनांक16/12/2024

जाहिरात आणि अर्ज लिंक

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
नोकरी अपडेटwww.navinjahirat.com.

अर्ज करण्याची प्रक्रीर्या

  • सर्वात आधी जाहीर माझगाव कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 16 डिसेंबर 2024 आहे त्या आधी सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज भरून घ्यायचे आहे.
  • तुमचा अर्जाची नोंदणी करावी नंतर कोणत्या पदासाठी पात्र आहेत त्या पदासाठी अर्ज करा.
  • ज्या उमेदवारांना शुल्क लागू होते त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्जाची रक्कम भरायची आहे.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रत काढून ठेवा.
  • परीक्षे बद्दल माहिती अधिकृत वेबसाईट वरती किंवा तुमचा इमेल वरती पाठवण्यात येईल.

Leave a Comment