सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

वित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे, पुणे विभाग मध्ये विविध जागांची भरती | Mahakosh Bharti 2025

वित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे, पुणे विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. तर Mahakosh Bharti 2025 या जाहिरातीमध्ये एकूण 75 पदांची भरती केली जाणार आहे तर हि एकूण 75 जागा कनिष्ठ लेखापाल (गट-क) या पदासाठी आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. Mahakosh Bharti साठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात ३१ डिसेंबर २०२४ पासून झालेली आहे आणि अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी आहे या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यायचे आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Mahakosh Bharti 2025 | भरतीची जाहिरात माहिती

वित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे, पुणे विभागाकडून Mahakosh Bharti 2025 जाहीर करण्यात आलेली आहे तर या भरतीसाठी लागणारी महत्वाची माहिती खाली देण्यात आलेली आहे इच्छुक उमेदवारांनी या भरती बद्दल पूर्ण माहिती वाचून नंतर अर्ज करा.

विभागाचे नाववित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे, पुणे विभाग
भरतीचे नावMahakosh Bharti 2025
भरतीची जाहिरात दिनांक३१ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन अर्ज
अर्जाची सुरुवात दिनांक३१ डिसेंबर २०२४
शेवटची दिनांक३० जानेवारी २०२५
नोकरी ठिकाणपुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर
अर्जाची फीमागासवर्गीय- रु. 900 आणि
खुला प्रवर्ग- रु. 1000
वयाची अट१९ वर्ष ते ३८ वर्ष.
शिक्षणकोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
मासिक वेतनमहिना 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये या दरम्यान
निवड प्रक्रीर्याऑनलाईन परीक्षा
जाहिरातclick here
ऑनलाईन अर्जclick here
अधिकृत वेबसाईटclick here

Mahakosh Recruitment 2025 | भरती बद्दल पात्रता

Mahakosh Recruitment 2025 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे तर या भरतीमध्ये एकूण कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदासाठी 75 जागा आहेत. अर्ज हे ३१ डिसेंबर २०२४ पासून ते ३० जानेवारी २०२५ रोजी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवाराची वयाची अट हि किमान १९ वर्ष ते कमाल ३८ वर्ष या दरम्यान पाहिजे तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षाची सूट देण्यात आली आहे.

Mahakosh भरती मध्ये कनिष्ठ लेखापाल पदासाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता हि कोणतीही शाखेतील पदवी पूर्ण झालेली पाहिजे आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. अशा प्रकारे इच्छुक उमेदवाराचे शिक्षण पूर्ण पाहिजे. तसेच तुम्हाला मराठी आणि हिंदी भाषा बोलायला आणि लिहायला यायला पाहिजे कारण तुम्हाला नोकरी हि पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी करायला लागणार आहे त्यामुळे ग्रामीण भाषा बोलायला आले पाहिजे.

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन द्वारे परीक्षा होणार आहे त्यामुळे मिळालेल्या गुणानुसार यादी तयार करण्यात येईल आणि ज्या उमेदवाराचे निवड झालेले असेल त्यांना रुपये 29,200 ते रुपये 92,300 या दरम्यान पगार (वेतन) आहे. ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला अर्जाची शुल्क भरावी लागेल तर हि शुल्क मागासवर्गीय- रु. 900 आणि खुला प्रवर्ग- रु. 1000 अशा प्रकारे आहे आणि अर्जाची शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे.

Document List:

Mahakosh Bharti Document List 2025
Mahakosh Bharti Document
Mahakosh Bharti Document

Mahakosh Bharti 2025 Form Fill Up

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे.
  • अर्ज करण्याआधी जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा आणि नंतर अर्ज भरायला सुरुवात करा.
  • अर्ज भरतानी सर्वात अगोदर तुमच्या अर्जाची नोंदणी करून घ्या नंतर नंतर अर्ज भरायला सुरुवात करा.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी आणि आवश्यक विचारलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्जाची शुल्क जाती प्रमाणे आहे त्यामुळे तुमची अर्जाची शुल्क जेवढी असेल ती ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरावी.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
  • परीक्षेचा वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाईट वरती कळवण्यात येईल.

अशा प्रकारे Mahakosh भरतीची संपूर्ण माहिती या लेखातून देण्यात आलेली आहे जर काही अडचणी आल्यास तुम्ही आमचा सोबत संपर्क करा.

Leave a Comment