Krushi Yantrikikaran Yojana 2024 – महाराष्ट्र कृषी शासन विभागाकडून सन 2014-15 पासून महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु झाली होती. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा एकूण 40% आणि राज्य शासनाचा एकूण 60% एवढा सहभाग आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अवजारे महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत देण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये शेतकरी यांना ट्रॅक्टर, पॉवर टीलर, स्वयंचलित औजारे, ट्रॅक्टर चलीत औजारे, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे एवढ्या प्रकारची अवजारे मिळणार आहेत आणि हि योजना केंद्रपुरस्कृत आहे.
Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2024
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना हि विविध जातीप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे जसे कि अल्प व अत्यल्प भुधारक,अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकऱ्यांना एकूण 50% चा लाभ मिळणार आहे व इतर शेतकऱ्यांना 40% प्रमाणे लाभ मिळणार. या Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana चा लाभ फक्त महाराष्ट्र रहिवासी शेतकरी घेवू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वताची शेती असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनामध्ये लागणारी कागदपत्रे
- शेतकऱ्याकडे 7/12 व 8 अ उतारा असावा.
- जातीचा आणि रहिवासी दाखला पाहिजे.
- रेसन कार्ड.
- बँक खाते आणि आधार कार्ड.
- स्वताचे पासपोर्ट फोटो.
- खरीदी केलेली अवजारांची कोटेसन.
- तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल असायला पाहिजे.
Krushi Yantrikikaran Yojana Apply Link
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना GR | GR PDF |
अर्जाची लिंक | Apply Now |
नवीन योजना अपडेट | navinjahirat.com |
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत अवजारांची यादी
- ट्रॅक्टर
- पॉवर टीलर
- स्वयंचलित औजारे (उदा. रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर इत्यादी अवजारे)
- ट्रॅक्टर चलीत औजारे (रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर आणि इतर अवजारे)
- काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे (उदा. मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन आणि इतर अधिक अवजारे)
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत अवजारांची रक्कम एकूण किती आहे याबदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे व अधिक माहितीसाठी या योजनेचा GR वाचवा.
1. ट्रॅक्टर
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अवजारासाठी अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा अनुसूचित जातींसाठी 50% लाभ आणि अवजाराची रक्कम एकूण 1 लाख 25 हजार रुपये व इतर जातीसाठी 40% लाभ आणि अवजाराची अनुदानाची रक्कम एकूण 1 लाख रुपये मिळणार आहे.
2. पॉवर टीलर
पॉवर टीलर अवजारासाठी अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा अनुसूचित जातींचा शेतकऱ्यांना 8 बीएच पी पेक्षा जास्त असेल तर एकूण रक्कम 85 हजार रुपये आणि 8 बीएच पी पेक्षा कमी असेल तर रक्कम 65 हजार रुपये. तसेच इतर जातींचा 8 बीएच पी पेक्षा जास्त असेल तर 70 हजार रुपये आणि 8 बीएच पी पेक्षा कमी असल्यास 50 हजार रुपये एवढ्या प्रमाणात अवजाराची अनुदानाची मिळणार आहे.
3. स्वयंचलित औजारे
स्वयंचलित अवजारे हे अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा जातींचा शेतकऱ्यांना 50% आणि इतर लाभार्थी अर्जदारांना 40% प्रमाणे अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे.
स्वयंचलित औजारे | अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा | इतर लाभार्थी |
---|---|---|
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) | 1 लाख 75 हजार रुपये | 1 लाख 40 हजार रुपये |
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) | 2 लाख 50 हजार रुपये | 2 लाख रुपये |
रीपर | 75 हजार रुपये | 60 हजार रुपये |
पॉवर वीडर (2 बीएचपी, 5 बीएचपी आणि 5 बीएचपी पेक्षा अधिक) | 25 हजार रुपये – 63 हजार रुपये पर्यंत | 20 हजार रुपये – 50 हजार रुपये पर्यंत |
4. ट्रॅक्टर चलीत अवजारे
महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलीत अवजारे मध्ये रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर आणि इतर अवजारे शासन अंतर्गत अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा जमीतीसाठी 50% आणि इतर लाभार्तीसाठी 40% प्रमाणे राक्कामची लाभ देण्यात येणार आहे.
ट्रॅक्टर चलीत अवजारे | अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा | इतर लाभार्थी |
---|---|---|
रोटाव्हेटर | 5 फुट- 42 हजार रुपये. 6 फुट- 44 हजार 800 रुपये. | 5 फुट- 34 हजार रुपये. 6 फुट- 35 हजार 800 रुपये. |
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर | 4 टन प्रती तास पेक्षा कमी- 1 लख रुपये. 4 टन प्रती तास पेक्षा जास्त- 2 लाख 25 हजार रुपये. | 4 टन प्रती तास पेक्षा कमी- 80 रुपये. 4 टन प्रती तास पेक्षा जास्त- 2 लाख रुपये. |
पेरणी यंत्र | 20 हजार रुपये. | 16 हजार रुपये. |
रेजड बेड प्लांटर | 35 हजार रुपये. | 35 हजार रुपये. |
कल्टीव्हेटर | 50 हजार रुपये | 40 हजार रुपये |
पलटी नांगर | हायड्रॉलिक डबल बॉटम- 70 हजार रुपये. हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम- 89 हजार 500 रुपये. मेकॅनिकल डबल बॉटम- 40 हजार रुपये. | हायड्रॉलिक डबल बॉटम- 56 हजार रुपये. हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम- 71 हजार 600 रुपये. मेकॅनिकल डबल बॉटम- 32 हजार रुपये. |
नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम | 50 हजार रुपये. | 40 हजार रुपये. |
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर | 1 लाख 25 हजार रुपये. | 1 लाख रुपये. |
विडर/वीड स्लैशर | 75 हजार रुपये. | 60 हजार रुपये. |
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर | 1 लाख रुपये. | 80 हजार रुपये. |
5. काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरण अवजारासाठी अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा अनुसूचित जमातीसाठी महाराष्ट्र शासन कडून 60% प्रमाणे अवजारांचे अनुदान आहे आणि इतर इतर लाभार्थी अर्जदाराला 40% अवजारांची अनुदान दिलेली आहे.
तंत्रज्ञान उपकरणे | अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (रक्कम)– (60%) | इतर लाभार्थी (रक्कम)– (50%) |
---|---|---|
मिनी दाल मिल | 1 लाख 50 हजार रुपये | 1 लाख 25 हजार रुपये |
मिनी राईस मिल | 2 लाख 40 हजार रुपये | 2 लाख रुपये |
पैकिंग मशीन | 3 लाख रुपये | 2 लाख 40 हजार रुपये |
ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर | 60 हजार रुपये | 50 हजार रुपये |
क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर | 1 लाख रुपये- (50%) | 80 हजार रुपये- (40%) |
Krushi Yantrikikaran Yojana 2024 – Apply Process
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनासाठी शेतकऱ्यांनी ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी. महाराष्ट्र रहिवासी शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जावून आपल्या अर्जाची नोंदणी करून घ्यायची आहे. या योजनेमध्ये अर्जदाराला शुल्क 20 रु. आहे आणि GST 03 रु. आहे तर एकूण शुल्क 23 रुपये आहे आणि हि शुल्क ओनलाईन पद्धतीने भरायची आहे.
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ज्या शेतकरी ने अर्ज केले असेल त्यांना मोबाईल मध्ये SMS येईल आणि ज्या अर्जदाराचे निवड झाली नाही त्यांनी पुढचा वर्षी परत अर्ज करायचा आहे. त्यासाठी पुन्हा अर्ज भरायचे नाही परंतु उपलोड केलीली सर्व कागदपत्रे तपासून घ्यायची आहेत. शेतकऱ्यांनी अर्ज बघण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर युझरआयडी आणि पासवर्ड टाकून परत अर्ज बघू शकतात.
1 thought on “Krushi Yantrikikaran Yojana 2024 – महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर व इतर औजारे)”