नमस्कार, तुमचा बाबांसाठी मराठी मध्ये कविता शोधता? तर आज मी तुमचासाठी अतिशय संदूर बाबांसाठी कविता लिहिल्या आहेत ह्या कविता तुम्हाला नक्की आवडतील अशी मी आशा करतो. तर मित्रांनो मैत्रींनो आपण आज थोडक्यात Babansathi Kavita Marathi या विषयावर चर्चा करूया त्यानंतर आपण Baba Var Kavita मराठी मध्ये लिहूया. बाबानाच वडील सुद्धा म्हणतात तर बाबा हे आपल्याला लहानापासून मोठे करतात आपल्याला जे काही हवे ते घेऊन देतात त्यामुळे सर्वांचे बाबा खूप चांगले असतात. बाबा हे आपल्या घरातील मुख्य सदस्य असतात त्यानंतर आई सुद्धा खूप काळजी करते.
Baba Var Kavita In Marathi | Poem on Father in Marathi
तर चला आता आपण Baba Var Kavita Marathi मध्ये बघूया खाली वेग वेगळ्या मराठी मध्ये बाबांसाठी कविता द्याल्या आहेत ज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्ही ओळी वापरू शकता.
1. बाप लेक
सगळ्यात जास्त ओढ बाप लेकीच्या
नात्यात असते असे म्हणतात ते खरचं आहे हे…
आईने जरी नऊ महिने पोटात सांभाळून जन्म दिला असला
तरी बापाचं काळीज म्हणजे लेक असते
आई वडिलांच्या प्रेमाची तुलना नाहीच होऊ शकत
ही गोष्ट जरी खरी असली तरी बापाचं लेकी वरच आणि लेकीच बापावरच प्रेम चिमुटभर तरी जास्त असतं…
कारण बाप हा असा एकमेव व्यक्ती आहे जो तिला कधीच धोका देत नाही, रडवत नाही, पाहिजे ती हौस पूर्ण करतो
कायम तिची एखाद्या राजकुमारी सारखी काळजी घेतो.
संपूर्ण जग जरी विरोधात गेलं तरी बाप हा लेकीसोबत खंभिर उभा असतो…
2. बाबांची कविता
हि कहाणी आहे एका, दमलेल्या बापाची,
त्याने घेतलेल्या त्या, शेवटच्या श्वसाची..
उभा होता समोर त्याच्या, मुत्यूपलीकडेचा काळ,
तुटत चालली होती त्यांची, संसाराशी असलेली नाळ…
नजर अंधुक होताना मात्र, बायको दिसत होती स्पष्ट,
जिचे हट्ट पुरवण्यासाठी त्याने, केले होते अपार कष्ट….
तिच्या एका बाजूला उभी होती, मुलगी त्याची पहिली,
आयुष्यभराची कमाई जिच्या, लग्नात होती वाहिली…
दुसऱ्या बाजूला उभा होता, मुलगा खूप शिकलेला,
ज्याच्यासाठी जमिनीचा एक, तुकडा विकलेला…
दिनरात एक करून मग, त्याने फेडले होते कर्ज,
स्वताःच्या सुखाचा पण, नव्हता भरला कधी अर्ज…
रोज मरून जगणारा बाप जेव्हा… मरणाला भिडला,
बापाचं जगणं पाहून खरं तर तेव्हा..” मूत्यूही रडला”..
खरं तर तेव्हा..” मूत्यूही रडला “…..
3. बाबा वरती कविता
माझ्या पप्पांनी मला बोट धरून चालायला शिकवलं, पडल्यावर उठवलंच, पण आधी तोल सावरायला शिकवलं..
खूप सुंदर दिसायचे डोंगर रस्ते, झाडं नद्या आणि इमारती मांडीवर बसवून जेव्हा खिडकी बाहेरच जग त्यांनी दाखवलं..
कुतूहल अन जिज्ञासेच्या रोपट्याला, ज्ञानाचं खत पाणी देऊन, अवतीभवती चौकस दृष्टीने बघायला त्यांनी शिकवलं..
खूप वेग वेगळ्या प्रवृत्ती असतात माणसांच्या या जगात, माणूस पाहून, एका भेटीत माणूस ओळखायला त्यांनी शिकवलं..
कठीण प्रसंगातून सावरायचं कसं, हे त्यांनी स्वतः सावरून शिकवलं, पण त्यांची छाया नसेल जेव्हा, जगायचं कसं त्यांनी ते नाही शिकवलं..
4. प्रिय माझे बाबा
बाप आयुष्यभर कमवत राहतो,
कण कण पोरीसाठी साठवत राहतो..
लेकीचं लगीन थाटा माटातच करायच,
त्याचसाठी जिंदगी आपली झिजवत राहतो..
लेक राहावी आयुष्यभर सुखात म्हणून,
जावई चांगला शोधत असतो..
शोधता शोधता पायातली खेटरं अन
लोकांचे उंबरेही तो झिजवत असतो..
बोहल्यावर चढलेली लेक बघून,
उर त्याचा पण भरून येतो..
निरोपावेळी लेक रडते आईपाशी,
बाप कोपऱ्यात राहून आसू गाळत असतो..
Lek Baba Poem & Sayari in Marathi
Shorts Marathi Poems on Father
Baba Var Kavita Poems and Sayari
अशा प्रकारे आपण आपल्या प्रिय बाबासाठी मराठी मध्ये कविता लिहू शकतो. ह्या सर्व कविता आवडल्यास तुमचा मित्रांना आणि मैत्रींना नक्की पाठवा.
हे पण वाचा: 100 + भावपूर्ण श्रद्धांजली संदेश बाबाला.