ESIC Pune Offline Bharti 2024 : कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, बिबवेवाडी, पुणे येथे एकूण विविध 50 जागांसाठी सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, सीनिअर रेजिडेंट्स-३ वर्षे आणि सोनिअर रेजिडेंट्स-१ वर्ष (जीडीएमओ पदाच्या विरुद्ध) कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी मुलाखती कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय सर्वे, क्र. ६९०, बिबवेवाडी, पुणे-३७ येथे होणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारणी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करायचे आहे. इच्छुक उमेदवार कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहू शकतात.
कामगार राज्य विमा महामंडळ भरती मध्ये मुलाखतीसाठी ऑफलाईन पद्धतीने दिनांक 10 डिसेंबर 2024 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे. पात्रता आणि इतर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे तसेच मूळ जाहिरातीमध्ये सुद्धा देण्यात आली आहे.
विभागाचे नाव : कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, बिबवेवाडी, पुणे.
पदांची नावे : या भरतीमध्ये मेडिकल ऑन्कोलॉजी, नेफ्रोलॉजी, ऍनेस्थेसियोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजी, मेडिसीन, ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी, ऑर्थोपेडिक्स, सायकी अँट्री, अक्सिडेंट अँड इमर्जन्सी, डेंटल (एंडोडोन्टिस्ट), ऍनेस्थेसियोलॉजी, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी, चेस्ट, डरमॅटॉलॉजी, ईएनटी, ऑप्थॉल्मॉलॉजी, मेडिसीन, ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी, ऑर्थोपेडिक्स, पेडिअट्रीक्स, रेडिऑलॉजी, सर्जरी, आयसीयू, आणि डेन्टिस्ट्री इत्यादी.
एकूण पदे : एकूण विविध पदांसाठी 50 जागा आहेत.
अर्ज करण्याची दिनांक : पदानुसार मुलाखत कधी होणार आहे त्याची माहिती मूळ जाहिरातीमध्ये तपासा. मुलाखत ऑफलाईन पद्धतीने 10 डिसेंबर 2024 ते 18 डिसेंबर 2024 रोजी या तरीखे पर्यंत घेण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : ज्या उमेदवारांनी निवड झालेल्या त्यांना नोकरी ठिकाण पुणे असणार आहे.
नोकरीचा प्रकार : हि नोकरी सरकारी आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना सरकारी नोकरी साठी खूप चांगली संधी मिळाली आहे.
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना कळवण्यात येते कि आपला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जाऊन जमा करायचा आहे. मुलाखतीसाठी जाण्या पूर्वी आपली सर्व शैक्षणिक पात्रता, आणि इतर कागदपत्रे सोबत घेऊन जावी.
भरतीसाठी मुलाखत पत्ता: पात्र उमेदवारांनी मुलाखत साठी या पत्त्यावर जायचे आहे. पत्ता: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, स. नं. ६९०, बिबवेवाडी, पुणे, पिनकोड- ४११०३७.
शैक्षणिक पात्रता : या भरतीमध्ये विविध पदासाठी भरती करण्यात येणार आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता मूळ जाहिराती मध्ये बघा. मूळ जाहिरात pdf खाली दिलेली आहे.
वयाची अट : उमेदवाराचे वय किती पाहिजे हे मूळ जाहिरातीमध्ये मध्ये दिलेली नाही परंतु अर्जदाराचे वय किमान 18 वर्षा पेक्षा जास्त असावे.
वेतनश्रेणी : उमेदवाराला वेतन हे वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय चा नियमानुसार देण्यात येणार आहे.
महत्वाच्या तारीख :
मुलाखत दिनांक : 10/12/2024/ ते 18/12/2024. (पदानुसार मुलाखत दिनांक मूळ जाहिरातीमध्ये दिलेले आहे). |
महत्वाच्या लिंक :
जाहिरात | click here |
अधिकृत वेबसाईट | click here |
नवीन सरकारी नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |