Bank Letter Format : आपण आज Bank Application Format Marathi या विषयावर अर्ज चर्चा करणार आहोत. बँक मध्ये अर्ज मागितला कि खूप जणांना अर्ज कसा लिहावा त्याबद्दल काही माहिती नसते त्यामुळे त्यांना अर्ज लिहायला अडचणी येतात. बँक मध्ये कोणत्याही कामासाठी अर्ज मागितल्यावर अर्ज कसा लिहावा आणि अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. गरजू उमेदवारांनी खाली Bank Arj in Marathi मध्ये नमुना बघून बँक साठी अर्ज लिहायचा आहे. बँकेचे अर्ज विविध प्रकारचे असतात ते सर्व अर्जाचे नमुने खाली दिलेले आहेत.
Bank Application Format Marathi
- बँक नवीन पासबुक अर्ज
- बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज
- बँक खाते KYC अर्ज
- बँक खाते बंद झाल्यावर अर्ज
- बँकेत नोकरीसाठी अर्ज
- बँक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज
या सर्व कामासाठी अर्ज मराठी मध्ये कसे लिहावे त्यासाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच अर्जाचे फोर्मेट सुद्धा दिले आहेत. ज्या कामासाठी बँक मध्ये अर्ज करता त्यासाठी अर्जाचा नमुना बघून त्यानुसार तुमचा अर्ज तयार करा.
1. बँक नवीन पासबुक अर्ज
Bank New Passbook Arj:
प्रति,
शाखा व्यवस्थापक
(शाखेचे नाव)
(बँकेचा पत्ता)
अर्जादारचे नाव: (इथे तुमचे पूर्ण नाव टाका)
विषय: नवीन पासबुक प्रदान करण्यासाठी अर्ज.
महोदय/महोदया,
वरील सविनय विषयानुसार अर्ज सादर करतो कि (तुमचे नाव) राहणारा (तुमचे गावाचे नाव). मी (बँक चे नाव) या बँक मध्ये दि. २४ जानेवारी २०२५ या दिवसी मी नवीन खाते सुरु केले परंतु आता पर्यंत मला बँक कडून नवीन खाते पासबुक मिळाले नाही त्यामुळे आज मी हा अर्ज केला आहे. माझी खाते क्रमांक आणि खाते प्रकार खाली दिलेले आहे.
कृपया करून मला लवकरात लवकर बँक कडून पासबुक खाते मिळावे हि आपणास नम्र विनंती. माझे खाते तपशील खाली नमूद आहेत:
खाते क्रमांक: (तुमचे खाते क्रमांक)
खाते प्रकार: बचत/चालू (योग्य ते निवडा)
आपला विश्वासू,
(तुमचे नाव)
(स्वाक्षरी)
2. बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज
Bank Account Close Arj:
प्रति,
शाखा व्यवस्थापक
(शाखेचे नाव)
(बँकेचा पत्ता)
अर्जादारचे नाव: (इथे तुमचे पूर्ण नाव टाका)
विषय: बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज.
महोदय/महोदया,
वरील सविनय विषयानुसार अर्ज सादर करतो कि (तुमचे नाव) राहणारा (तुमचे गावाचे नाव). माझे (बँक चे नाव) या बँक मध्ये खाते असून मला काही अडचणी आल्यामुळे या बँक मध्ये खाते बंद करावे लागणार आहे. कारण मी आता शहरी भागात राहायला जाणार आहे म्हणून मला या बँक मध्ये पैसे भरणे काढणे जमणार नाही त्यामुळे मी माझे खाते बंद करणार आहे.
कृपया करून माझे बँक खाते बंद करा हि आपणास नम्र विनंती. माझे खाते तपशील खाली नमूद आहेत:
खाते क्रमांक: (तुमचे खाते क्रमांक)
खाते प्रकार: बचत/चालू (योग्य ते निवडा)
आपला विश्वासू,
(तुमचे नाव)
(स्वाक्षरी)
3. बँक खाते KYC अर्ज किंवा बँक खाते बंद झाल्यावर अर्ज
Bank KYC Arj:
प्रति,
शाखा व्यवस्थापक
(शाखेचे नाव)
(बँकेचा पत्ता)
अर्जादारचे नाव: (इथे तुमचे पूर्ण नाव टाका)
विषय: बँक खाते KYC करण्याबाबत अर्ज.
महोदय/महोदया,
वरील सविनय विषयानुसार अर्ज सादर करतो कि (तुमचे नाव) राहणारा (तुमचे गावाचे नाव). माझे खाते (बँक चे नाव)या बँक मध्ये आहे परंतु मी शहरी भागात राहतो त्यामुळे मला बँक मध्ये पैसे भरायला आणि काढायला जमत नसल्यामुळे माझे खाते बंद झाले आहे. पण मी आता माझी गावाला आलो आणि मला बँक मधून पैसे काढायचे आहेत परंतु खाते बंद असल्यामुळे मला बँक KYC करायला लागणार आहे. बँक KYC फोर्म भरून मी या अर्जासोबत जोडला आहे.
कृपया करून मला माझे बँक खाते KYC करून द्यावे, हि आपणास नम्र विनंती. माझे खाते तपशील खाली नमूद आहेत:
खाते क्रमांक: (तुमचे खाते क्रमांक)
खाते प्रकार: बचत/चालू (योग्य ते निवडा)
आपला विश्वासू,
(तुमचे नाव)
(स्वाक्षरी)
4. बँक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज
Bank Loan Arj:
प्रति,
शाखा व्यवस्थापक
(शाखेचे नाव)
(बँकेचा पत्ता)
अर्जादारचे नाव: (इथे तुमचे पूर्ण नाव टाका)
विषय: बँक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज.
महोदय/महोदया,
वरील सविनय विषयानुसार अर्ज सादर करतो कि (तुमचे नाव) राहणारा (तुमचे गावाचे नाव). माझे खाते क्रमांक (नंबर टाका) आणि खात्याचा प्रकार बचत खाते आहे. मी बँकेचा ग्राहक असून मला माझ्या व्यवसायासाठी 1 लाख रुपये कर्ज बँक कडून हवे. कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे फोर्म सोबत जोडली आहेत. मी माझा नवीन व्यवसाय सुरु करणार आहे आणि या व्यवसायासाठी मला बँक कडून आर्थिक मदत मिळावी. कर्जाचे व्याज दर महिना वेळेवर भरेन हि माझी जबाबदारी असणार आहे.
कृपया करून मला 1 लाख रुपयेची आर्थिक मदत म्हणून कर्ज पाहिजे त्यामुळे तुम्हाला विनंती करतो कि माझे कर्ज लवकरात लवकर मंजूर करावेत हि आपणास नम्र विनंती आहे.
धन्यवाद्
आपला विश्वासू,
(तुमचे नाव)
(स्वाक्षरी)