सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Principal Arj In Marathi Format – शाळेत किंवा कॉलेज मध्ये Principal ला अर्ज कसा लिहायचा?

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

नमस्कार, मित्र मैत्रींनो आज आपण या लेखामध्ये Principal Arj कसा लिहावा या बद्दल माहिती बघणार आहोत. कोणत्याही मोठे कामासाठी आपल्याला सरळ प्राचार्य ला अर्ज लिहावा लागतो त्यामुळे Principal ला मराठी मध्ये अर्ज कसा लिहायचा याचा नमुना मी तुम्हाला खाली दिलेला आहे. आपण शाळेत असताना मुख्याध्यापकांना अर्ज लिहतो परंतु कॉलेज मध्ये असताना आपल्याला principal ला अर्ज लिहावा लागतो.

Principal Arj In Marathi Format
Principal Arj In Marathi Format

तर खाली कामासाठी आपण जास्त अर्ज principal साठी लिहतो. Principal Arj नमुना खाली दिलेले आहेत.

Principal Arj In Marathi Format

Principal Arj In Marathi Format यादी (Principal Arj In Marathi Format Pdf):

  • कॉलेजमधून टी सी मिळण्यासाठी
  • बोनाफाईड साठी
  • शैषणिक प्रमाणपत्रे साठी अर्ज

1. Principal Arj Format – कॉलेजमधून टी सी मिळण्यासाठी

प्राचार्य,
गोदावरी कॉलेज तलासरी [कॉलेजचे नाव],
तलासरी केव्लीपदा [पत्ता].
दिनांक: 08/12/2024 [अर्ज लिहिण्याचा दिनांक]

विषय: शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) मिळण्याबाबत.

महोदय/महोदया,
वरील सविनय विषयास अर्ज सादर करतो/करते की, मी [तुमचे पूर्ण नाव] [विभाग/वर्गाचे नाव] या वर्गात शिकत होतो/होते. मला माझे पुढील शिक्षण [इतर ठिकाणी/इतर कॉलेजमध्ये] घेण्यासाठी टीसीची आवश्यकता आहे. कृपया मला शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावा, अशी मी विनंती करतो.
माझ्या खातरजमा करण्यासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे:
नाव: [तुमचे पूर्ण नाव]
वर्ग: [विभाग/वर्गाचे नाव]
प्रवेश क्रमांक: [तुमचा प्रवेश क्रमांक]

तरी, आपण कृपया माझ्या अर्जावर विचार करावा व मला लवकरात लवकर शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध करून द्यावा. हि आपणास नम्र विनंती.
धन्यवाद!

आपला विश्वासू,
[तुमचे पूर्ण नाव]
[संपर्क क्रमांक]

2. Principal Arj Bonafite Format – बोनाफाईड सर्टिफिकेटसाठी अर्ज नमुना

प्राचार्य,
गिर्वाग पाटील कॉलेज [कॉलेजचे नाव],
तलासरी पाटीलपाडा, तालुका- डहाणू [पत्ता].
दिनांक: 09/12/2024 [अर्ज लिहिण्याचा दिनांक]

विषय: बोनाफाईड सर्टिफिकेट मिळण्याबाबत अर्ज.

महोदय/महोदया,
वरील सविनय विषयास अर्ज सादर करतो/करते की, मी [तुमचे पूर्ण नाव] [विभाग/वर्गाचे नाव] या वर्गात शिकत होतो/होते. मला माझ्या कामासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट ची गरज पडली आहे त्यामुळे मला आपल्या कॉलेज मधून बोनाफाईड सर्टिफिकेट मिळावा.
नाव: [तुमचे पूर्ण नाव]
वर्ग: [विभाग/वर्गाचे नाव]
प्रवेश क्रमांक: [तुमचा प्रवेश क्रमांक]

तरी, आपण कृपया माझ्या अर्जाचा विचार करावा व मला बोनाफाईड सर्टिफिकेट उपलब्ध करून द्यावे, ही विनंती. हि आपणास नम्र विनंती.
धन्यवाद!

आपला विश्वासू,
[तुमचे पूर्ण नाव]
[संपर्क क्रमांक]

3. शैषणिक प्रमाणपत्रे साठी Principal Arj

प्राचार्य,
विश्व हिंदू कॉलेज तलासरी [कॉलेजचे नाव],
झारी पाटीलपाडा, तालुका- तलासरी [पत्ता].
दिनांक: 10/12/2024 [अर्ज लिहिण्याचा दिनांक]

विषय: शैषणिक प्रमाणपत्रे मिळण्याबाबत.

महोदय/महोदया,
वरील सविनय विषयास अर्ज सादर करतो/करते की, मी संजय देशमुख राहणारा तलासरी, आपल्या महाविद्यालयात F.Y, b.sc मध्ये Div-A मध्ये शिकत असून मला माझ्या उच्च शिक्षण, नोकरी, इ. साठी शैक्षणिक प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे कृपया करून माझे अर्ज मान्य करावे आणि आपणास नम्र विनंती आहे कि मला लवकरात लवकर शैषणिक प्रमाणपत्रे मिळावे. हि आपणास नम्र विनंती.
धन्यवाद!

आपला विश्वासू,
[तुमचे पूर्ण नाव]
[संपर्क क्रमांक]

अशा प्रकारे आपण “Principal arj in marathi” मध्ये लिहू शकतो. या मध्ये फक्त तुम्हाला नमुना दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःचे नाव, कॉलेजचे नवन दिनांक, आणि विषय काय आहे हे सगळ बदल करून घ्यायचे आहे. काही अडचणी आल्यावर कृपया करून आमचा सोबत संपर्क करा.

हे पण वाचा:

Shala Sodlyacha Dakhala Arj In Marathi.
Bank Application Format Marathi.
Police Station Complaint Arj In Marathi.

Leave a Comment