नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड कडून नवीन भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे हि जाहिरात दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झालेली होती तर या जाहिरात भरतीमध्ये NALCO Non-Executive पदासाठी भरती आहे. Non-Executive विविध पदामध्ये विविध पदे आहेत तर या सर्व पदांसाठी एकूण ५१८ जागा रिक्त आहेत. कुठलाही भारतीय या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो परंतु या भरती मध्ये पात्र असायला पाहिजे.
NALCO Non-Executive Bharti साठी उमेदवाराचे शिक्षण 10वी, 12वी, ITI आणि पदवी पूर्ण झालेली पाहिजे कारण हे शिक्षण पदानुसार वेगळे असणार आहे त्यामुळे आपल्या पात्रते नुसार पदासाठी ऑनलाईन अर्ज करा. ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी पासून घोषित करण्यात आलेली आहे तसेच अर्जाची अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी आहे.
NALCO Non-Executive Recruitment 2025 मध्ये होणाऱ्या भरतीमध्ये पगार हा 12,000 ते 70,000 रुपये या दरम्यान पदानुसार पगार दिला जाणार आहे. तसेच या भरतीसाठी वयाची अट १८ वर्ष ते ३५ वर्षा पर्यंत आहे त्यामुळे पदानुसार मूळ जाहिरातीमध्ये वयोमर्यादा तपासून घ्यावे.
NALCO Non-Executive Recruitment 2025
संस्थेचे नाव
नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड
जाहिरात दिनांक
२० डिसेंबर २०२४
अर्जाची सुरुवात
३१ डिसेंबर २०२४
अंतिम दिनांक
२१ जानेवारी २०२५
एकूण पदे
५१८ जागा
पदाचे नाव
Non-Executive (विविध पदे खाली यादी बघा)
अर्ज पद्धत
ऑनलाईन
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
NALCO Non-Executive Bharti पदे, पदांची संख्या आणि वयोमर्यादा
SUPT(JOT) लेबोरेटरी (37 पदे) – १८ वर्ष ते २७ वर्ष
SUPT(JOT) ऑपरेटर (226 पदे) – १८ वर्ष ते २७ वर्ष
SUPT(JOT) फिटर (73 पदे) – १८ वर्ष ते २७ वर्ष
SUPT(JOT) इलेक्ट्रिकल (63 पदे) – १८ वर्ष ते २७ वर्ष
SUPT(JOT) इन्स्ट्रुमेंटेशन (M&R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P) (48 पदे) – १८ वर्ष ते २७ वर्ष
SUPT (JOT) जियोलॉजिस्ट (04 पदे) – १८ वर्ष ते २७ वर्ष
SUPT (JOT) HEMM ऑपरेटर (09 पदे) – १८ वर्ष ते २७ वर्ष
SUPT (SOT) माइनिंग (01 पद) – १८ वर्ष ते २८ वर्ष
SUPT (JOT) माइनिंग मेट (15 पदे) – १८ वर्ष ते २७ वर्ष
SUPT (JOT) मोटार मेकॅनिक (22 पदे) – १८ वर्ष ते २७ वर्ष
ड्रेसर-कम- फर्स्ट एडर (W2 Grade) (05 पदे) – १८ वर्ष ते ३५ वर्ष
लॅब टेक्निशियन ग्रेड.III (PO Grade) (02 पदे) – १८ वर्ष ते ३५ वर्ष
नर्स ग्रेड.III (PO Grade) (07 पदे) – १८ वर्ष ते ३५ वर्ष
फार्मासिस्ट ग्रेड.III (PO Grade) (06 पदे) – १८ वर्ष ते ३५ वर्ष