महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील 905 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय (GR) नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
| तपशील | माहिती |
|---|---|
| विभागाचे नाव | भूमी अभिलेख विभाग, महाराष्ट्र |
| एकूण पदे | 905 |
| पदांचा प्रकार | गट क संवर्गातील पदे |
| भरती प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा + मुलाखत |
| GR जाहीर तारीख | सप्टेंबर 2025 |
| अधिकृत संकेतस्थळ | भूमी अभिलेख विभाग |
भूमी अभिलेख विभागातील काम

भूमिअभिलेख विभागातर्फे नागरिकांना खालील महत्त्वाची कामे केली जातात:
- फेरफार उतारे
- जमीन नोंदी व उतारे
- जमीन मोजणी (शेती / बिनशेती / पोट हिस्सा मोजणी)
- भूकरमापकांच्या मार्फत मोजणी कामे
पदांची रिक्तत
सध्या भूमिअभिलेख विभागात सुमारे 4000 पदांपैकी दीड हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापैकी मोठा भाग भूकरमापकांचा आहे. आता नवीन भरतीमुळे या विभागातील कामकाजाला गती मिळणार आहे.
उमेदवारांची अपेक्षा
गेल्या काही वर्षांपासून या भरतीची मागणी उमेदवार करत होते. विशेषत: भूकरमापकांच्या पदांसाठी लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आता नवीन GR जाहीर झाल्यामुळे, भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
अर्ज प्रक्रिया
👉 अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक लवकरच प्रसिद्ध होईल.
👉 उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट व नोकरी पोर्टल्स पाहावेत.
भूमिअभिलेख विभागातील 905 नवीन पदांची भरती राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार आहे.
सरकारने घेतलेला हा निर्णय नागरिकांना सेवा देण्यासाठी आणि रिक्त पदे भरून विभागातील कामकाज सुरळीत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
✅ महत्वाचे दुवे (Important Links):
🔗 अधिकृत GR पाहा
🔗 अर्ज लिंक (लवकरच उपलब्ध)
🔗 भूमिअभिलेख विभाग संकेतस्थळ
