Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण (SJSA), पुणे कडून विविध पदांसाठी भरतीची जाहिरात दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली होती. समाज कल्याण भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक या सर्व पदांसाठी भरायचे आहे. तर या सर्व पदांसाठी एकूण 219 जागा आहेत. या भरतीसाठी शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे तर आता या भरतीसाठी अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारंचे अर्ज राहिलेले होते त्यांनी ऑनलाईन अर्ज लवकरात भरून घ्यावा.
महाराष्ट्र राज्यात समाज कल्याण विभागाकडून एकूण 219 जागा विविध पदांसाठी आहेत तर या पदांसाठी लागणारी पात्रता आणि इतर माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. आणि भरतीची जाहिरात सुद्धा दिलेली आहे. उमेदवारांनी जाहीर झालेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
◾ भरतीचा विभाग : समाज कल्याण भरती हि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे विभागा मार्फत भरती केली जाणार आहे.
◾ पदांची नावे : हि भरती विविध पदांसाठी केली जाणार आहे.
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05 पदे.
- समाज कल्याण निरीक्षक – 39 पदे.
- वॉर्डन – 153 पदे.
- उच्च श्रेणी लघुलेखक – 10 पदे.
- निम्न श्रेणी लघुलेखक – 03 पदे.
- लघुलेखक – 09 पदे.
◾ पदांची संख्या :महाराष्ट्र समाज कल्याण भरती मध्ये एकूण 219 पदांची संख्या आहे.
◾ नोकरी ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे.
◾ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि कोणतीही शाखेतील पदवी. पदानुसार शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये बघा.
◾ अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज भरण्यासाठी खाली अर्जाची लिंक दिली आहे त्याचा उपयोग करून अर्जाची नवीन नोंदणी करून नंतर कोणत्या पदासाठी अर्ज करता ते निवडून अर्जामध्ये पूर्ण माहिती भरून नंतर अर्ज जमा करा.
◾ वयोमर्यादा : वयाची अट किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष आहे.
- ST/SC उमेदवारांना 05 वर्ष सूट (वयाची अट 18 वर्ष ते 43 वर्ष).
◾ शुल्क : या भरतीसाठी सर्व उमेदवारांकडून अर्जाची ऑनलाईन शुल्क घेण्यात येणार आहे. शुल्क प्रवर्गानुसार खाली दिलेली आहे.
- खुला प्रवर्ग : रु. 1000/-.
- राखीव प्रवर्ग – रु. 900/-.
◾ वेतनश्रेणी : या भरती मधून नोकरीला लागल्यावर वेतन हे पदानुसार वेग वेगळे मिळणार आहे तर उमेदवारांना दरमहा रु. 25,500 ते रु. 1,42,400 या दरम्यान मिळणार आहे.
◾ निवड प्रक्रीर्या : निवड हि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आणि मुलाखत किंवा कागदपत्रे तपासणी केली जाईल.
◾ महत्वाच्या तारीख :
अर्जाची सुरुवात दिनांक | 10/10/2024 |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | 15/12/2024 |
◾ जाहिरात : इथे क्लिक करा.
◾ अर्ज भरण्याची लिंक : इथे क्लिक करा.
◾ अधिकृत वेबसाईट : www.sjsa.maharashtra.gov.in.
◾ सरकारी नोकरी अपडेट : www.navinjahirat.com.