नमस्कार, मित्र मैत्रींनो आज आपण शाळा सोडल्याचा दाखला अर्ज मराठी मध्ये कसा लिहायचा? या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण जेव्हा शाळेतून निघून जातो किंवा आपले शिक्षण पूर्ण होते तेव्हा आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला दिला जातो. त्या वेळेस आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला अर्ज लिहावा लागत नाही. परंतु आपल्या कडून 1ली ते 12वी किंवा पदवी शिक्षण होऊन नंतर जर आपल्याकडे शाळा सोडल्याचा दाखला हरवला असेल तर पुन्हा एकदा आपण शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून किंवा कॉलेज मधून मागू शकतो त्या वेळेस आपल्याकडून एक Shala Sodlyacha Dakhala Arj मागितला जातो. किंवा मुला मुलींचे शिक्षण चालू असेल आणि त्यांना दुसऱ्या शाळेत किंवा कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्या शाळेतून कॉलेजमधून शाळा सोडल्याचा दाखला मागवा लागतो त्यासाठी आपल्याकडून अर्ज लिहून घेतात.
पण आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला कसा लिहायचा या बद्दल काही माहिती नसल्यामुळे आपण अर्ज लिहायला कमजोर पडतो असाच कारणामुळे आज मी तुमचासाठी शाळा सोडल्याचा दाखला अर्ज मराठी मध्ये कसा लिहायचा त्याचा नमुना घेवून आलो आहे. कृपया करून मी दिलेला शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना पूर्ण वाचून त्यामध्ये तुमचे नाव, शाळेचे नाव, आणि इतर गोष्टी मध्ये बदल करायचे आहे. हा शाळा सोडल्याचा दाखला फक्त एक अर्ज नमुना म्हणून दिलेला आहे.
Shala Sodlyacha Dakhala Arj In Marathi – शाळा सोडल्याचा दाखला नमुना
Shala Sodlyacha Dakhala Arj Format: शाळा सोडल्याचा दाखला दोन प्रकारचे असतात 1. पालकांनी शाळेला अर्ज आणि 2. मुला मुलीनी शाळेला अर्ज . शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) म्हणजे शाळेत शिकलेल्या कालावधीचा पुरावा असतो. हा दाखला नवीन शाळेत प्रवेश घेताना आवश्यक असतो. तुम्हाला दोन्ही अर्जाचे नमुने दिलेले आहेत एकदा पूर्ण वाचून नंतर अर्ज लिहावा.
1. पालकांनी शाळेला अर्ज लिहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना
प्रति,
मुख्याध्यापक,
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गिरगाव (शाळेचे नाव),
गिरगाव, तालुका-तलासरी, पालघर 401606 (शाळेचा पत्ता).
विषय: शाळा सोडल्याचा दाखला मिळण्याबाबत अर्ज.
महोदय/महोदया,
सविनय वरील विषयास अर्ज सादर करतो की, माझा मुलगा/मुलगी संजय सुदाम माही, सध्या आपल्या शाळेत इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. आम्ही काही कौटुंबिक कारणांमुळे शाळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
तुमचा शाळेत मिळालेल्या शिक्षणामुळे माझ्या मुलाला/मुलीला चांगला अनुभव मिळाला आहे, याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.
कृपया माझ्या मुला/मुलींचे शाळा सोडल्याचा दाखला लवकरात लवकर देण्याची कृपा करावी हि आपणास नम्र विंनती आहे.
आपला विश्वासू,
(पालकाचे नाव)
(संपर्क क्रमांक)
1. मुला-मुलींनी शाळेला अर्ज लिहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना
प्रति,
मुख्याध्यापक,
गिरगाव आश्रम शाळा (तुमचे शाळेचे नाव),
गिरगाव, तालुका-तलासरी, पालघर 401606 (तुमचा शाळेचा पत्ता).
विषय: शाळा सोडल्याचा दाखला मिळण्याबाबत अर्ज.
महोदय/महोदया,
सविनय वरील विषयास अर्ज सादर करतो की, मी कुणाल राध्या पारधी, आपल्या शाळेत इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. आम्ही काही कौटुंबिक कारणांमुळे शाळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
मला आपल्या शाळेत मिळालेल्या शिक्षणामुळे चांगला अनुभव मिळाला आहे, याबद्दल मी या शाळेचे मनःपूर्वक आभारी आहे.
कृपया मला शाळा सोडल्याचा दाखला लवकरात लवकर देण्याची कृपा करावी. हि आपणास नम्र विनंती.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
(कुणाल राध्या पारधी)
(तुमचा/पालकांचा संपर्क क्रमांक)
अशा प्रकारे आपण नवीन शाळा सोडल्याचा दाखला किंवा दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आपल्या शाळेला अर्ज लिहू शकतो. तर या लेखातून आपण मुला/ मुलींनी शाळा सोडण्यासाठी शाळेला अर्ज कसा लिहावा आणि पालकांनी स्वतःचे मुलांसाठी किंवा मुलींसाठी शाळेला अर्ज कसा लिहायचा या बद्दल सर्व चर्चा केली आहे.
हे पण वाचा: