Sutti Sathi Arj: नमस्कार, आज आपण या लेखाचा माध्यामतून Sutti Sathi Arj कसा लिहायचा या बद्दल चर्चा करणार आहेत. मित्रांनो आणि मैत्रींनो कोणत्याही शाळेत, कॉलेजमध्ये किंवा कंपनी मध्ये असताना जास्त दिवस सुट्टी हवी असते त्यामुळे आपल्याला अर्ज लिहावा लागतो. तर आज आपण Sutti Sathi Arj Marathi मध्ये कसा लिहायचा हे या लेखातून पाहणार आहोत. शाळेत असताना सुट्टी साठी आपल्याला अर्ज हा वर्ग शिक्षक किंवा वर्ग शिक्षिका कडे जमा करावा लागतो तसेच कॉलेज साठी सुट्टी पाहिजे असल्यास अर्ज हा प्रिन्सिपल्स ला द्यायला लागतो पण कंपनी मध्ये असणाऱ्या उमेदवारांना अर्ज HR कडे जमा करायचे असते. चला तर आपण कोणत्याही कामासाठी सुट्टी चा अर्ज कसा लिहायचा ते बघूया. तुम्हाला खाली Sutti Sathi Arj Marathi Format मध्ये दिलेला आहे.
Sutti Sathi Arj In Marathi Format – सुट्टी साठी अर्ज मराठी मध्ये
कोणत्याही कामासाठी किंवा शाळेत, कॉलेजमध्ये सुट्टी घेण्यासाठी किंवा कंपनी मध्ये सुट्टी साठी आपण अर्ज कसा लिहायचा. सुट्टी साठी अर्ज आपण मराठी मध्ये लिहणार आहोत तर अर्ज कसा लिहावा आणि सुट्टी साठी अर्जाचा नमुना दिलेला आहे त्यामध्ये फक्त तुम्ही तुमची माहिती भरावी. तर आज आपण शाळेत सुट्टी साठी अर्ज, कॉलेज सुट्टी साठी अर्ज, कंपनी मध्ये सुट्टी साठी अर्ज या बद्दल माहिती बघणार आहे.
1. School Sutti Sathi Arj – शाळेत सुट्टी साठी अर्ज मराठी मध्ये
शाळेत असताना जास्त दिवस सुट्टी पाहिजे असते तेव्हा आपल्याला अर्ज द्यावा लागतो. इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत मुला मुलींना सुट्टी साठी अर्ज द्यायला लागतो परंतु सुट्टी साठी अर्ज कसा लिहायचा याची कल्पना नसते त्यामुळे अर्ज लिहायला त्यांना अडचणी येतात परंतु मी अर्जाचा नमुना तुमचा समोर दिलेला आहे ते बघून तुम्ही शाळेत सुट्टी साठी अर्ज लिहू शकता.
School Sutti Sathi Arj Format:
प्रती,
मुख्याध्यापक,
शासकीय आश्रम शाळा तलासरी (शाळेचे नाव),
गिरगाव तलासरी (शाळेचा पत्ता)
विषय: सुट्टी मिळण्याबाबत अर्ज.
अर्जदार: संजय रामा पाटील (तुमचे स्वतःचे नाव)
महोदय,
वरील विषयास अर्ज सादर करतो कि, मी संजय राम पाटील, इयत्ता 7 वी मध्ये अ गट मध्ये शिकत असून मला माझ्या मामाचा घरी लग्न असल्यामुळे मला 4 दिवसाची सुट्टी पाहिजे. मामाचा घरी दि. २०/१२/२०२४ ते २४/१२/२०२४ या तारखेला लग्न असल्यामुळे मी शाळेतून सुट्टी घेणार आहे आणि २५/१२/२०२४ या तारीखेला मी शाळेत हजर राहेण.
कृपया करून मला लग्नासाठी सुट्टी मिळावी हि आपणास नम्र विनंती आहे. धन्यवाद्
आपला विश्वासू
संजय राम पाटील
2. College Sutti Sathi Arj– कॉलेज सुट्टी साठी अर्ज
कॉलेज मध्ये असताना आपल्याला सुट्टी पाहिजे असते तेव्हा आपल्याला कॉलेजला अर्ज द्यावा लागतो तर तो अर्ज कसा लिहावा आणि तसेच खाली तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला आहे. कॉलेजमध्ये कोणत्याही कामासाठी अर्ज लिहिताना हाच नमुना वापरा पण यामध्ये तुम्ही तुमचे नाव, कॉलेजचे नाव, पत्ता, आणि कारण लिहताना त्यामध्ये बदल करून घ्यायचे आहे.
College Sutti Sathi Arj Format:
प्रती,
मुख्याध्यापक,
गोदावरी कॉलेज तलासरी (कॉलेजचे नाव),
मुंबई पाटीलपाडा – ४०१६०६ (कॉलेजचा पत्ता)
विषय: सुट्टी मिळण्याबाबत अर्ज.
अर्जदार: प्रणय संजय गावित (तुमचे स्वतःचे नाव)
महोदय,
वरील विषयास अर्ज सादर करतो कि, मी प्रणय संजय गावित, FYBSC Div-A मध्ये शिकत असून मला मुंबई शहरामध्ये मामाकडे जातीचा दाखला घ्यायला जायचे आहे म्हणून मला 2 दिवसाची सुट्टी पाहिजे. मुंबई शहर माझ्या गावापासून खूप लांब आहे त्यामुले मला एक दिवस जायला आणि एक दिवस घरी यायला सुट्टी लागेल. मला दि. १०/१२/२०२४ ते दि. १२/१२/२०२४ या तारखेला मला कॉलेज मधून सुट्टी पाहिजे. .
कृपया करून माझे अर्ज मंजूर करावे हि आपणास नम्र विनंती आहे. धन्यवाद्
आपला विश्वासू
प्रणय संजय गावित
3. Company Sutti Sathi Arj– कंपनी सुट्टी साठी अर्ज
कंपनी मध्ये असताना आपल्याला रोज खूप कामे असतात त्यामुळे आपण अस काम सोडून अचानक जावू शकत नाही त्यामुळे आपल्याला HR ला सुट्टी साठी अर्ज लिहावा लागतो परंतु अर्जामध्ये काय लिहावे आणि अर्ज कसा लिहावा या बद्दल माहिती नसते. पण मी तुमचासाठी सुट्टीचा अर्ज नमुना खाली लिहलेला आहे ते बघून तुम्ही सुट्टी साठी अर्ज लिहा.
Company Sutti Sathi Arj Format:
प्रती,
मॅनेजर (HR),
चंदन स्टील कंपनी (कंपनीचे नाव),
उमरगाव – ४०१६०६ (कंपनीचा पत्ता)
विषय: सुट्टी मिळण्याबाबत अर्ज.
अर्जदार: सयोग रमेश जाधव (तुमचे स्वतःचे नाव)
महोदय,
वरील विषयास अर्ज सादर करतो कि, मी सयोग रमेश जाधव, आपल्या कंपनी मध्ये सुपर वायझर म्हणून काम करत असून मला घरी जाण्यासाठी 10 दिवसाची सुट्टी पाहिजे. मी मागचा 5 महिन्यापासून घरी गेलेलो नाही. माझ्या घरी माझी बायकोची तबेत चांगली नाही त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जायच आहे त्यामुळे मला दि. २०/१२/२०२४ ते दि. ३०/१२/२०२४ या तरीखेपर्यंत सुट्टी पाहिजे. मी दि. ३१/१२/२०२४ या तारीखेला कंपनीमध्ये हजर राहेण. .
कृपया करून माझे अर्ज मंजूर करावे हि आपणास नम्र विनंती आहे. धन्यवाद्
आपला विश्वासू
सयोग रमेश जाधव
Leaving Application in Marathi
आपल्याला कोणत्याही कामासाठी अर्ज लिहायचा असेल तर हाच मजकूर वापरा पण ज्या कामासाठी अर्ज लिहता ते अर्जामध्ये टाका तरच तुम्हाला सुट्टी देण्यात येईल. असा प्रकारे आपण कोणत्याही कामासाठी किंवा सुट्टीसाठी अर्ज लिहू शकतो. अधिक येणाऱ्या अपडेट साठी नवीन जाहिरात वेबसाईट वरती तपासा.
हे पण वाचा