सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ : तब्बल १५,६३१ रिक्त पदे शासनाने दिली मोठी मान्यता

महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस दलातील तसेच कारागृह विभागातील १५,६३१ रिक्त पदे भरण्याला हिरवा कंदील दिला आहे. १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून पोलीस शिपाई संवर्गातील १००% पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे हजारो तरुणांना पोलिस दलात नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

एकूण उपलब्ध पदांचा तपशील

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार खालील प्रमाणे पदे उपलब्ध होणार आहेत –

  • पोलीस शिपाई – 12,399 जागा
  • सशस्त्र पोलीस शिपाई – 2,393 जागा
  • कारागृह शिपाई – 580 जागा
  • पोलीस शिपाई चालक – 234 जागा
  • बॅंडस्मन – 25 जागा

यामुळे एकूण 15,631 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

शासनाने का घेतला निर्णय?

३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ५०% पदे भरण्यास अनुमती होती, मात्र सध्या पोलीस दलातील रिक्त पदांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने विशेष निर्णय घेत १००% रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे.

भरती प्रक्रियेबाबत महत्त्वाचे निर्णय

  • भरती घटकस्तरावरूनच राबवली जाणार आहे.
  • OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी अर्ज करण्यासाठी दिली जाणार आहे.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹450/- तर मागास प्रवर्गासाठी ₹350/- राहील.
  • परीक्षा शुल्कातून जमा होणारी रक्कम ही भरती प्रक्रियेवर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर पोलीस भरती २०२५ प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागावे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

तयारी कशी करावी?

  • गेल्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.
  • शारीरिक चाचणीसाठी रोज व्यायाम, धावणे सुरू करावे.
  • अभ्यासासाठी कायद्याचे मुलभूत पुस्तक, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यावर लक्ष द्यावे.

महत्त्वाच्या लिंक

2 thoughts on “महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ : तब्बल १५,६३१ रिक्त पदे शासनाने दिली मोठी मान्यता”

Leave a Comment