नमस्कार, मित्रांनो तुम्ही अजूनही डोमासाईल प्रमाणपत्र काढले नसेल तर काढून ठेवा कारण महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या उमेदवारांकडे डोमासाईल दाखला असायला पाहिजेच. डोमासाईल प्रमाणपत्र यालाच अधिवास प्रमाणपत्र सुद्धा म्हणतात. तर आज आपण अधिवास प्रमाणपत्र कसे काढावे आणि डोमासाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात या बदल चर्चा करणार आहोत.
डोमासाईल काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात?
Domicile Certificate Sathi Lagnare Kagad Patra खाली दिलेली आहेत, जर तुमचाकडे खाली दिलेली सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अधिवास प्रमाणपत्र काढू शकता.
डोमासाईल काढण्यासाठी कागदपत्राची यादी (Domicile Certificate Documents List in Marathi) :
- तुमचे आधार कार व पॅन कार्ड.
- जन्म प्रमाणपत्र.
- रेशनकार्ड.
- शाळा सोडल्याचा दाखला (तुमचा आणि पालकांचा).
- स्वतःचे फोटो.
- रहिवासी दाखला.
- बोनाफाईड सर्टिफिकेट (उमेदवार शिक्षण घेत असल्यास).
- स्वयंघोषणापत्र इत्यादी.
Domicile certificate documents in marathi pdf.
अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी एवढ्या कागदपत्राची गरज उमेदवारांना पडणार आहे जर कि तुमचाकडे हि सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही डोमासाईल दाखला काढू सकता.
डोमासाईल प्रमाणपत्र म्हणजे काय?
डोमासाईल प्रमाणपत्र म्हणजे आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत हे दर्शवण्यासाठी म्हणून अधिवास दाखल्याचा वापर करतात.
महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या सर्व महिला पुरुषांकडे डोमासाईल प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे कारण कोणत्याही कामासाठी अधिवास प्रमाणपत्र मागितला जातो. या डोमासाईल दाखल्याचा उपयोग शिक्षणासाठी किंवा इतर सरकारचा काही योजना किंवा नोकरी साठी हे प्रमाणपत्र मागितले जाते आणि प्रत्येक उमेदवाराकडे डोमासाईल प्रमाणपत्र असायलाच पाहिजे.
महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्र कसे मिळवायचे? Domicile Certificate Online Apply
महाराष्ट्रामध्ये राहत असून अजूनही अधिवास प्रमाणपत्र काढले नाही अशा उमेदवारांनी अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी वरती दिलेली सर्व कागदपत्रे गरज पडणार आहे त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
- ऑनलाईन अधिवास प्रमाणपत्र कसे मिळवायचे?
- ऑफलाईन अधिवास प्रमाणपत्र कसे मिळवायचे?
1. डोमासाईल दाखला काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज
डोमासाईल दाखला काढण्यासाठी जर कि ऑनलाईन अर्ज करायचे असल्यास महा ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन तिथे अर्ज भरू शकता. आताचा काळात सर्व काही ऑनलाईन झालेले आहे त्यामुळे आपला जवळच्या ठिकाणी भरपूर महा ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावून तिथे दिलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
2. डोमासाईल दाखला काढण्यासाठी ऑफलाईन अर्ज
ऑफलाईन पद्धतीने जर डोमासाईल दाखला काढायचा असल्यास आपल्या जवळच्या सेतू कार्यालयामध्ये किंवा तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात सर्व कागदपत्रे घेऊन जायचे आहे. त्या नंतर पुढची प्रक्रीर्या तुम्हाला त्यांचा कडून कळवण्यात येईल.
अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी करू शकता. या लेखानिमित्त काही अडचणी असल्यास आमचा सोबत संपर्क करा.