‘भटक्या-विमुक्तां’च्या धर्तीवर मिळणार आता कुणबी प्रमाणपत्रे! – नवा जीआर तयार
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं, मोर्चे, उपोषणं होत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील कुणबी जातीचा दाखला मिळावा, यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने २००८ मध्ये भटक्या आणि विमुक्त जातींसाठी काढलेल्या शासन निर्णयाच्या (जीआर) धर्तीवर आता कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन जीआर तयार करण्याची…

