सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

जालना पोलीस पाटील भरती 2025 : अंबड तालुक्यातील 184 रिक्त पदांसाठी 30% महिला आरक्षण सोडत जाहीर!

जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरती 2025 अंतर्गत अंबड तालुक्यातील 184 गावांसाठी 30% महिला आरक्षण सोडत 04 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात होणार. अर्ज व आक्षेप नोंदणी 08 ते 10 सप्टेंबर दरम्यान.

जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीसंदर्भात नवीन परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. मा. जिल्हाधिकारी, जालना यांच्या सुधारीत आदेशानुसार अंबड उपविभागातील 184 गावांमध्ये पोलीस पाटील पदांची रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

तपशील माहिती
एकूण रिक्त पदे 184
सोडत प्रकार गावनिहाय, जात प्रवर्गनिहाय
महिला आरक्षण 30%
सोडतीची तारीख 04 सप्टेंबर 2025
वेळ सकाळी 10.30 वा.
ठिकाण तहसील कार्यालय, अंबड सभागृह

आक्षेप नोंदणी:
ज्या उमेदवारांना आरक्षणाबाबत आक्षेप नोंदवायचा असेल त्यांनी 08 सप्टेंबर 2025 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान उपविभागीय अधिकारी, अंबड येथे लेखी स्वरूपात अर्ज दाखल करणे अनिवार्य आहे.

👉 सर्व संबंधित उमेदवारांनी ठरलेल्या तारखेला उपस्थित राहावे व प्रशासनास सहकार्य करावे.

Leave a Comment