Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकार कडून माझी लाडकी बहिण योजना फक्त महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या महिलांसाठी काढली होती. लाडकी बहिण योजना – Ladki Bahin Yojana हि दिनांक २८ जून २०२४ महराष्ट्र शासनाकडून घोषित केली होती. या योजनेमध्ये महिलांचे वयोमर्यादा १८ वर्ष ते ६५ वर्षा पर्यंत होते. प्रत्येक महिलांना दरमहा 1500 रुपये या योजने अंतर्गत मिळणार आहे. लाडकी बहिण योजनेची शेवटची अर्ज करण्याची दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी होती. ज्या या योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी www.ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईट वरती जाऊन नवीन अर्जाची नोंदणी करायची आहे.
लाडकी महाराष्ट्र लाडकी बहिण योजना नवीन अपडेट
माझी लाडकी बहिण योजनाची नवीन अपडेट तपासण्यासाठी www.ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in या संकेतस्थळावर जाऊन तुमचा आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर टाका आणि त्या नंतर मोबाईल नंबर वरती एक OTP (One Time Password) येईल ते टाकून झाल्यास पोर्टल वरती लोगिन होईल. लाडकी बहिण चा पोर्टल वरती किती पैसे मिळाले आणि किती येणार आहेत या बद्दल सर्व माहिती तिथे बघायला मिळणार आहे. ज्या महिलांचे एक किंवा दोन वेळा पैसे बँक खात्या मध्ये आले आहेत त्यांना कोणतीही काळजी नाही कारण त्यांचे अर्ज महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेले आहेत त्यामुळे या वेळी सुद्धा बँक खाते मध्ये 1500 रुपये जमा होतील. परंतु ज्या महिलांचे अर्ज अजून पर्यंत प्रलंबित (pending) आहेत किंवा अर्ज मंजूर झालेत परंतु एकदाही लाडकी बहिण योजनेचे पैसे बँक मध्ये आलेले नाही त्या महिलांनी परत एकदा अर्ज तपासा.
माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे आले नाहीत
ज्या महिलांचे अजून पर्यंत लाडकी बहिण योजनाचे पैसे बँक खातेमध्ये आलेले नाही अशा महिलांची खालील प्रमाणे केलेल्या चुका आपल्या अर्जामध्ये परत तपासा.
- ज्या महिलांचा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा अधिक आहे का? जर असेल तर तुम्ही या योजेनेमध्ये अपात्र आहेत.
- तुमचाकडे कोणतीही सरकारी नोकरी नसावी.
- महिलांचे वय 18 वर्ष ते 65 वर्ष या दरम्यान असावे.
- महिला फक्त महाराष्ट्र मध्ये राहणारी रहिवासी पाहिजे.
- महिलांचा नावावर कोणतीही चार चालक वाहन नसावे.
- अर्ज भरतानी स्वतचे नावे, बँक माहिती आणि आधार कार्ड ची माहिती बरोबर टाकावी.
- त्यानंतर सांगितलेले कागदपत्रे चांगल्या पद्धतीने अपलोड करावीत.
- तुमचा फोटो आणि लाइव फोटो मोबाईल वरून चांगला स्पष्ट दिसेल तसा काढावा.
ज्या महिलांनी अर्ज केले परंतु त्यांना पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांना वरती दिलेल्या चुका आपल्या अर्जामध्ये तपासा.
Ladki Bahin Yojana Status Check
लाडकी बहिण योजना मध्ये अर्ज केल्यास महिलांनी स्थिती (status) तपासणीसाठी सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे.
त्यानंतर अर्जदार लोगिन वरती क्लिक करा व नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड टाका जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर Forget password वरती क्लिक करा.
अर्जदाराचे लोगिन झाल्यावर तिथे सर्व मिळालेले पैसे आणि इतर माहिती तपासा. ज्या महिलांचे अजूनही पैसे आले नाहीत त्यांनी थोडे दिवस वाट बघा. महिलांसाठी येणाऱ्या नवीन योजनाची अपडेट पाहण्यासाठी नवीन जाहिरात वेबसाईट वरती भेट द्या.