महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी! राज्यातील वन विभाग (Van Vibhag) अंतर्गत वनरक्षक (Forest Guard) पदांसह इतर पदांसाठी तब्बल 12,991 जागांची मेगा भरती होणार आहे.
जाहिरात व अर्ज प्रक्रिया:
या भरतीसाठी अधिकृत जाहिरात व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नियमितपणे वन विभागाची अधिकृत वेबसाईट mahaforest.gov.in तपासत राहावी.
विभागाचे नाव: | वन विभाग |
पदांची सख्या: | 12,991 |
पदाचे नाव: | वनरक्षक (Forest Guard) |
शैक्षणिक पात्रता: | 1) 12वी उत्तीर्ण (विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यातील किमान एक विषय असावा). 2) काही विशेष प्रवर्ग (ST, माजी सैनिक, नक्षल पीडित कुटुंब) यांना 10वी उत्तीर्ण असूनही अर्ज करता येणार आहे. |
वयाची अट: | सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे मागास प्रवर्ग: 18 ते 32 वर्षे |
शुल्क: | खुला प्रवर्ग: ₹1000/- मागासवर्गीय: ₹900/- |
शारीरिक चाचणी: | पुरुष उमेदवार: 5 किमी धावणे महिला उमेदवार: 3 किमी धावणे |
नोकरी ठिकाण: | महाराष्ट्र राज्यातील विविध वन विभागाचे प्रादेशिक कार्यालये व वनपरिसर |
पदांचे तपशील: | वनरक्षक (Forest Guard) – 12,991 पदे |
अर्ज दिनांक : | तारीख जाहीर होताच ( ) |
अर्जाची लिंक: | क्लिक करा |
जाहिरात : | इथे क्लिक करा |
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 – पदांचे तपशील (Posts Details):
या भरतीत वनरक्षक (Forest Guard) सह विविध तांत्रिक व लिपिकीय पदांचा समावेश आहे.
मुख्य पदे:
- वनरक्षक (Forest Guard) – 12,991 पदे
इतर अपेक्षित पदे (अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतात):
- लघुलेखक (उच्चश्रेणी व निम्नश्रेणी)
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
- वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
- लेखापाल
- सर्वेक्षक
- शिपाई / मदतनीस
- सफाई कामगार
- प्रिंटर ऑपरेटर
- रखवालदार
सर्वाधिक भरती वनरक्षक पदासाठीच (Forest Guard) आहे, परंतु इतर तांत्रिक व सहाय्यक पदांसाठीही लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे.
अर्ज प्रक्रिया (Online Application Form)
- अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in ला भेट द्या.
- “भरती प्रक्रिया (Recruitment)” टॅब वर क्लिक करा.
- “Apply Online” लिंक उघडून आवश्यक माहिती भरा.
- अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
- अर्जाची प्रिंट काढून जतन करा.
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी अभ्यासात कसूर न करता तयारी सुरू ठेवावी!