आज आपण वाक्य प्रकार (Vakyanche Prakar) आणि त्यांचे उदाहरणे या लेखातून पाहणार आहोत. 1 ली ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना वाक्य प्रकारे माहिती असायला पाहिजेत. वाक्यांचे विविध प्रकार आहेत आणि त्यासोबत वर्गीकरण आणि उदाहरणांसह माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. अर्थानुसार वाक्यांचे प्रकार, रचनेनुसार वाक्यांचे प्रकार, विधीप्रमाणे वाक्यांचे प्रकार आणि काळानुसार वाक्यांचे प्रकार असा प्रकारे चार वाक्यांचे प्रकार आहेत.
वाक्याचे प्रकार व उदाहरणे – Vakyanche Prakar in Marathi
खाली तुम्हाला Vakyanche Prakar Marathi भाषेमध्ये दिलेले आहेत.
अर्थानुसार वाक्यांचे प्रकार
अर्थानुसार वाक्यांचे प्रकार सुद्धा पाच विविध प्रकार आहेत ती पाच प्रकार विधानात्मक वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थक वाक्य आणि इच्छार्थक वाक्य व उद्गारार्थी वाक्य इत्यादी.
1. विधानात्मक वाक्य (Narrative/Assertive Sentence)
ज्या वाक्याची कोणतीही गोष्ट स्पष्टपणे सांगतात किंवा विधान करतात त्याला विधानात्मक वाक्य असे म्हणतात.
विधानात्मक वाक्याचे उदाहरण वाचा:
- अजय अभ्यास करतो.
- मी शाळेत जातो.
- सुर्य पूर्वेला उगवतो.
विधानात्मक वाक्याचे सुद्धा दोन भाग होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य असे आहेत.
1. होकारार्थी वाक्य- होकारार्थी वाक्यातून कोणत्याही गोष्टीचा होकार दर्शविला जातो त्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. (1) मला खेळायला आवडते. (2) मला पुस्तक वाचायला आवडते.
2. नकारार्थी वाक्य– नकारार्थी वाक्यातून कोणत्याही गोष्टीचा नकार दर्शविला जातो त्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. (1) (2)
2. प्रश्नार्थक वाक्य (Interrogative Sentence)
ज्या वाक्य मध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारतात त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात.
प्रश्नार्थक वाक्याचे उदाहरण:
- तुझे नाव काय आहे?
- तू घरी कधी येणार?
- तुमचा शाळेचे नाव काय आहे?
- तुला क्रिकेट खेळायला आवडते का?
3. आज्ञार्थक वाक्य (Imperative Sentence)
जी वाक्ये कोणत्याही गोष्टीची आज्ञा, विनंती, सल्ला किंवा सूचना देतात, त्याला आज्ञार्थक वाक्य असे म्हणतात.
आज्ञार्थक वाक्याचे उदाहरण:
- कृपया मला मदत करा.
- सर्वांनी वर्गात शांत बसा.
- मुलांनो चांगला अभ्यास करा तरच चांगला पेपर जाईल.
4. इच्छार्थक वाक्य (Optative Sentence)
ज्या वाक्यामध्ये कोणत्याही गोष्टीची शुभेच्छा, आशीर्वाद किंवा इच्छा व्यक्त करतात, त्याला इच्छार्थक वाक्य असे म्हणतात.
इच्छार्थक वाक्याचे उदाहरण:
- देव तुला आयुष्यामध्ये खूप आनंदी ठेवो.
- तुला आयुष्यात यश मिळावा.
- तुझी स्वप्न पूर्ण व्हावी.
5. उद्गारार्थी वाक्य (Exclamatory Sentence)
ज्या वाक्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा आश्चर्य, आनंद, दुःख, आनंद, राग इत्यादी भावना व्यक्त करतात, त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उद्गारार्थी वाक्याचे उदाहरण:
- वा! आज तू किती सुंदर दिसतेस.
- अरे बापरे ! आज मला खूप काम आहे.
- गप बस किती बोलतेस.
- अरे देवा! मी अभ्यास करायला विसरलो.
रचनेनुसार वाक्यांचे प्रकार
रचनेनुसार वाक्यांचे एकूण तीन प्रकार आहेत. (1) केवल वाक्य (2) संयुक्त वाक्य (3) मिश्र वाक्य.
1. केवल वाक्य
ज्या वाक्यामध्ये एकच वाक्याचा मुख्य अर्थ असतो त्याला केवल वाक्य असे म्हणतात.
केवल वाक्याचे उदाहरण:
- मी शाळेत जातो.
- मी खूप हुशार मुलगा आहे.
- मला क्रिकेट खेळायला आवडते.
2. संयुक्त वाक्य
ज्या वाक्य मध्ये दोन किंवा अधिक अर्थ होतात त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. जर वाक्यामध्ये “आणि, पण, म्हणून” हे शब्द आले तर ते संयुक्त वाक्य आहे.
संयुक्त वाक्याचे उदाहरण:
- मी कल रात्री अभ्यास केला आणि माझे पेपर चांगले गेले.
- मला वाचायला आवडते पण लिहायला जास्तच आवडते.
- मी आईला भेटायला गेलो म्हणून मला आईने पैसे दिले.
3. मिश्र वाक्य
ज्या गोष्टीमध्ये मुख्य वाक्य आणि त्यास जोडलेले गौण वाक्य असते त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात.
मिश्र वाक्याचे उदाहरण:
- जो विद्यार्थी मेहनत करतो, तो नक्की यशस्वी होतो.
- ज्या वेळी मी घर सोडले, त्या वेळी पाऊस पडत होता.
विधीप्रमाणे वाक्यांचे प्रकार
विधीप्रमाणे वाक्यांचे दोन प्रकारे आहेत (1) कर्तरी वाक्य (2) कर्मणी वाक्य.
1. कर्तरी वाक्य
ज्या वाक्यात कर्ता प्रधान असतो आणि तो क्रिया करतो त्याला कर्तरी वाक्य असे म्हणतात.
कर्तरी वाक्याचे उदाहरण:
- रामने पुस्तक वाचले.
- मुलगी गाणे गाते.
2. कर्मणी वाक्य
ज्या वाक्यात कर्त्याचा उल्लेख नसतो किंवा कृतीवर भर दिला जातो त्याला कर्मणी वाक्य असे म्हणतात.
कर्मणी वाक्याचे उदाहरण:
- पुस्तक वाचले गेले.
- गाणे गायले जाते.
काळानुसार वाक्यांचे प्रकार
काळानुसार वाक्यांचे एकूण तीन प्रकार आहेत. (1) भूतकाळ (2) वर्तमानकाळ (3) भविष्यकाळ.
1. भूतकाळ
ज्या वाक्याची कृती आधीच घडून गेलेली असते त्याला भूतकाळ असे म्हणतात.
उदाहरण:
- मी काल शाळेतगेलो होतो.
- मी काल पुस्तक वाचत होतो.
- तिने शाळेत जाऊन परीक्षा दिली.
2. वर्तमानकाळ
ज्या वाक्याची कृती सध्या घडत असते त्याला वर्तमानकाळ असे म्हणतात.
उदाहरण:
- मी अभ्यास करत आहे.
- मी सध्या जेवत आहे.
- मी क्रिकेट खेळत आहे.
3. भविष्यकाळ
ज्या वाक्याची कृती पुढील काळात घडणार असते त्याला भविष्यकाळ असे म्हणतात.
उदाहरण:
- मी उद्या शाळेत जाईन.
- मला उद्या पैसे पाहिजेत.
- माझे भाऊ 2 दिवसा नंतर घरी येतील.