महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) गडचिरोली विभागामध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice – विजतंत्री, तारतंत्री आणि COPA) पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. महावितरणतर्फे नोकरी शोधणाऱ्या ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज प्रक्रिया 01 सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊन 10 सप्टेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
उपलब्ध पदांची माहिती
या भरतीत एकूण 107 रिक्त जागा आहेत. त्यामध्ये विभागवार पदसंख्या खालीलप्रमाणे आहे :
- विजतंत्री (Electrician) – 54 जागा
- तारतंत्री (Wireman) – 40 जागा
- COPA (Computer Operator and Programming Assistant) – 13 जागा
शैक्षणिक पात्रता
महावितरण गडचिरोली भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे असावी :
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक.
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT), नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित व्यवसायातील परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
नोकरी ठिकाण
गडचिरोली जिल्हा, महाराष्ट्र
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय शासन नियमांनुसार असावे. (वयोमर्यादेबाबत अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.)
अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम उमेदवारांनी महावितरणची अधिकृत वेबसाईट येथे भेट द्यावी.
- भरती जाहिरात नीट वाचून आवश्यक कागदपत्रांची तयारी करावी.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावी.
👉 रेल्वे मध्ये 30307 पदांची मोठ्ठी भरती सुरु! | RRB NTPC Bharti 2025
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2025
महत्वाच्या लिंक्स
महावितरण गडचिरोली भरती 2025 ही गडचिरोली जिल्ह्यातील ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम रोजगाराची संधी आहे. विजतंत्री, तारतंत्री आणि COPA या तीन ट्रेड्ससाठी भरपूर पदे उपलब्ध आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करून ही सुवर्णसंधी नक्कीच गमावू नये.
नोकरीची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अधिक सरकारी नोकरी अपडेट्ससाठी दररोज navinjahirat.in ला भेट द्या.