सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी 21413 जागा

भारतीय डाक विभाग भरती साठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे परंतु त्या अगोदर पात्रता काय हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. तर मित्रांनो या भरती मध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी एकूण 21413 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात.

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

ज्या उमेदवाराचे शिक्षण 10वी पूर्ण आहे त्यांनी अर्ज ऑनलाईन करा. अर्जाची सुरुवात हि दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पासून झालेली आहे आणि अंतिम दिनांक हि 03 मार्च 2025 रोजी आहे.

ज्या उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्ष या दरम्यान असेल त्यांनी अर्ज करा. अर्ज करण्यासाठी खाली अर्जाची लिंक आणि जाहिरात pdf देण्यात आलेली आहे. हि जाहिरात पूर्ण पणे वाचा आणि नंतर अर्ज भरा कारण आपल्या महाराष्ट्र मध्ये किती जागा आहेत या बद्दल सुद्धा माहिती असायला पाहिजे.

महाराष्ट्र मध्ये भारतीय डाक विभाग कडून एकूण १४९८ जागा ग्रामीण डाक सेवक पदासाठी आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करा कारण या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही हि निवड सरळ तुमचा 10वी चा मार्क प्रमाणे निवड होणार आहे.

भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्जाची शुल्क खुला प्रवर्ग कडून 100 रुपये घेण्यात येणार आहेत आणि इतर उमेदवारांकडून शुल्क घेण्यात येणार नाहीत.