Kolhapur Police Bharti 2024: महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस पदासाठी भरती निघाली आहे. या “Kolhapur Police Recruitment 2024” मध्ये विधी अधिकारी आणि विधी अधिकारी-ब या दोन पदासाठी एकूण 22 पदांची भरती केली जाणार आहे. कोल्हापूर पोलीस भरती हि ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज जमा करायचा आहे. अर्ज जमा करण्याची शेवटची दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी आहे.
याबाबतची सविस्तर जाहिरात पोलीस अधीक्षक, कोल्हापूर कार्यालयाच्या www.kolhapurpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. उमेदवारांना कळवण्यात येते कि अर्जा पूर्वी प्रसिद्ध झालेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
कोल्हापूर पोलीस विभाग भरती पदे आणि पदांची संख्या
कोल्हापूर पोलीस भरतीमध्ये एकूण २२ पदांची जागा विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी या पदांसाठी आहेत.
पदाचे नाव | एकूण पदे |
विधी अधिकारी (गट-ब) | 01 पद |
विधी अधिकारी | 21 पदे |
कोल्हापूर पोलीस विभाग भरती शैक्षणिक पात्रता
कोल्हापूर पोलीस भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण खालील प्रमाणे पूर्ण झालेले पाहिजे.
- विधी अधिकारी (गट-ब) आणि विधी अधिकारी: पदवी + वकिली व्यवसायाचा कमीत कमी 02 वर्ष अनुभव. तेसच उमेदवारला मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
कोल्हापूर पोलीस विभाग भरती अर्ज प्रक्रीर्या
या पोलीस भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. तुमचा अर्ज हा 15 दिवसाचा आत मध्ये जमा करावा कारण अर्ज जमा करण्याची अंतिम दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी कोल्हापूर पोलीस अंतर्गत कळवण्यात आले आहे.
हे पण वाचा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नवीन भरती.
कोल्हापूर पोलीस विभाग भरती तारीख
जाहिरात दिनांक | 12/10/2024 |
अर्जाची सुरुवात | सुरुवात झालेली आहे |
अंतिम दिनांक | 16/12/2024 |
मुलाखत व लेखी | तुमचा मोबाईल वरती कळवण्यात येईल. |
कोल्हापूर पोलीस विभाग भरती निवड प्रक्रीर्या
कोल्हापूर पोलीस भरती साठी अर्जादाची निवड हि लेखी परीक्षा 50 गुण आणि मुलाखत 25 गुणांची घेतली जाईल अशा प्रकारे एकूण 75 गुणाची असेल त्यामध्ये उमेदवारांना किमान 60 गुण मिळाले पाहिजेत.
कोल्हापूर पोलीस विभाग भरती वयाची अट
विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी या पदासाठी अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 60 वर्षा पर्यंत असावे.
कोल्हापूर पोलीस विभाग भरती शुल्क
कोल्हापूर पोलीस विभाग भरतीमध्ये अर्जदाराकडून कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.
कोल्हापूर पोलीस विभाग भरती वेतनश्रेणी
या भरतीमध्ये नोकरी लागल्या नंतर तुमचे वेतन विधी अधिकारी (गट-ब) साठी 28,000 रुपये, आणि विधी अधिकारी पदासाठी वेतन 23,000 रुपये आहे.
कोल्हापूर पोलीस विभाग भरती अर्ज कसा करावा?
इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. तर हा अर्ज तुम्ही 15 दिवसाचा आत मध्ये दिलेल्या पत्त्यावर जमा करावा. अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे त्याची प्रिंट काढून अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा आणि अर्जावरची तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करता ते पण लिहायचे आहे. अर्ज छाननीनंतर लेखी परिक्षेचा दिनांक, वेळ व ठिकाण तसेच मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर कळविण्यात येईल. त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी कोणताही प्रवास खर्च देण्यात येणार नाही.
कोल्हापूर पोलीस विभाग भरती जाहिरात pdf आणि अर्ज नमुना
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज नमुना | इथे क्लिक करा |
सरकारी नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |